Thursday, January 9, 2025

/

गोगटे उड्डाण पुलाला आली तडे मुजवण्याची वेळ’

 belgaum

उदघाटन होऊन अद्याप पंधरा दिवस झालेले नसताना नव्याने उभारण्यात आलेल्या गोगटे सर्कल येथील उड्डाणपुलाच्या भिंतींना तडे गेले आहेत .अतिशय धोकादायक परिस्थितीत हा ब्रिज उभा असल्याचा धोका निर्माण झाला आहे.
महिनाभराच्या आतच तडे मुजवण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. या ब्रिज वरील रस्ता खचला त्यानंतरच्या एकूणच कामकाजाची पाहणी करून या संदर्भात सातत्याने आवाज उठवल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी त्या कंत्राटदाराकडून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे .

यासंदर्भात पाहणी करताना बेळगावकर नागरिकांनी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काळजी न घेता उभारण्यात आलेला हा ब्रिज किती दिवस टिकेल असा संशय नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे .ब्रिटिश कालीन ब्रिज पाडवत असताना जेसीबी मशीन मोडण्याचे प्रकार घडत होते पण नवीन बांधलेला ब्रिज पंधरा दिवसांत खराब झाल्यास होणारे नुकसान मोठे होईल. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज नागरिकांनी बेळगावक live कडे व्यक्त केली.

Rob
यासंदर्भात रेल्वे प्रशासन आणि कंत्राटदाराने वेळीच लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे. आजुबाजुने बांधण्यात आलेल्या भिंतीला त्याबरोबरच इतर धोके होऊ नयेत याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

२५ नोव्हेंबरला अटल बिहारी वाजपेयी माजी पंतप्रधान यांच्या जयंतीदिनी हा ब्रिज लोकार्पण करण्यात आला. मात्र या ब्रिजच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता गंभीर बनत चालला आहे. कोट्यावधी खर्च करून घिसाडे घाईने काम केले तर जनतेचा पैसा कसा धुळीला मिळाला जातो याचे उदाहरण हा ब्रिज ठरत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.