एक अवजड वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात निलजी येथील युवक जागीच ठार झाल्याची घटना बेळगाव बागलकोट रोडवर पोतदार स्कुल समोर बुधवारी चारच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळाराम पाटील उर्फ मुलींमनी वय 35 रा.निलजी असे मयत युवकाचे नाव आहे.सदर युवक दुचाकी वरून बेळगावहून निलजी कडे जात होता त्यावेळी अवजड वाहनाने ठोकर दिली वाहनाने पलायन केले. घटनास्थळी ट्राफिक जाम झाला होता उत्तर रहदारी पोलिसांनी धाव घेऊन रहदारी नियंत्रणात आणली.
या घटनेत दुचाकी स्वार डोक्यावरून चाक गेल्याने त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. रहदारी उत्तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.