रिंगरोडचा वाढता विरोध आणि शेतकरी वर्गातून व्यक्त होत असलेला संताप यामुळे आता बेळगाव तालुक्यातून संताप व्यक्त केला जात आहे. होनगा येथे नुकतेच माती परीक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परतवून लावण्यात आले आहे. यामुळे पून्हा एकदा अधिकाऱ्यांना खाली हात परतावे लागले आहे.
माती परीक्षणासाठी बेळगुंदी येथील शेतकऱ्यांनी माती परीक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परतवून लावले होते आता पुन्हा होनगा येथील शेतकऱ्यांनी माती पतिक्षणाचे काम बंद पडले आहे. त्यामुळे रिंगरोडचा वाढता विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे रिंगरोडचे भवितव्य अंधारात आले आहे.
बेळगाव तालुक्यातील 427 हेक्टर जमीन आता रिंगरोडसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार असून अनेकांचे संसार वाऱ्यावर पडणार आहेत. एकीकडे शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी नको त्या योजना मंजूर करण्यात येतात तर दुसरीकडे त्यांच्या जमिनी घेऊन विकासाचे गाजर दाखवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
माती परीक्षण करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना यावेळी चांगलेच धारेवर धरण्यात आले. एक इंचही जमीन देणार नसल्याचे यावेळी ठणकावून सांगण्यात आले. तुमच्या मशीन येथून घेऊन जाण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला . यापुढे येथे कोणतेच परीक्षण करू नये असे सांगण्यात आले.