महसूल मंत्री आर व्ही देशपांडे हे सध्या दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आहेत. दुष्काळ आहे काम मिळत नाही म्हणून दुसऱ्या राज्यात जाण्याची वेळ कुणावरही येऊ देऊ नका असे सक्त आदेश त्यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.
आज जिल्हा पंचायतीच्या सभागृहात त्यांनी बैठक घेतली. बैलहोंगल व सौन्दत्ती येथील दुष्काळी भागांची पाहणी करून ते आले होते.जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी काय व्यवस्था केली आहे याची पाहणी सुद्धा त्यांनी केली.
जिल्ह्यात पाणी जास्त असलेल्या भागातील बोअर वेल ची पाहणी करून त्या बोअरवेल शी करार करून घ्या. पुढील सात दिवसात तितले पाणी अडचणीच्या भागात पाठवून द्या अशी सूचना सुद्धा त्यांनी केली.
दुष्काळी भागातील बेरोजगारांना मदत व्हावी म्हणून उद्योग खात्री योजनेतील कामाचे दिवस 100 वरून 150 करण्यात आलेले आहेत. अधिकाऱ्यांनी कृती आराखडा तयार करून त्यांची व्यवस्था करावी.
संपूर्ण राज्यात दुष्काळ असून 156 दुष्काळी तालुक्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडे 2434 कोटी निधीची मागणी केली आहे. असे त्यांनी सांगितले आहे. वन मंत्री सतीश जारकीहोळी, खासदार सुरेश अंगडी, आमदार महातेश कौजलगी, प्रादेशिक आयुक्त पी ए मेघनावर, जिल्हाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.