वडगांव मधील दोन युवक गेली दोन वर्षे यल्लमा देवीला यात्रेच्या निमित्त पायी चालत जात आहेत. सोशल मीडिया व व्यसनाच्या जाळ्यात सापडलेल्या युवा पिढीसाठी हा एक चांगला संदेश आहे.
मनोज वडवडगी व योगेश पाटील अशी त्या युवकांची नावे आहेत. प्रवास साधने आली परंतु शारीरिक श्रम केले नाहीत तर काय उपयोग नाही. व्यसने करून आणि सोशल मीडियात गुरफटून काय साध्य होणार नाही.
शरीर दुर्बल झाले तर महागात पडेल तेंव्हा धार्मिकता जपताना शरीर बळकट करण्याचा आदर्श हे तरुण जपत असून त्यांनी इतर तरुणांसमोरही एक आदर्श ठेवला आहे.
यात्रा म्हटली की खाणे पिणे आणि जल्लोष आले पण हे तरुण मागील दोन वर्षे या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन आपला नवीन आदर्श यात्रेचा मार्ग चालत आहेत.