खानापूर येथे नगरपंचायतने अत्याचारी व्यवहार सुरू केल्याचा आरोप करण्यात येत आहे त्यामुळे खानापूर येथे नाराजीचे वातावरण आहे. बाजाराच्या दिवशीही विक्री करण्यास खानापूरच्या प्रमुख रस्त्यावरून मज्जाव केला जात असल्याने ही नाराजी आहे.
खानापूर शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी शीवस्मारक चौकापासून सींडीकेट बँक पर्यत भाजी फळ विक्रेत्यांना रोज बसण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याबाबत नागरीकातून समाधान व्यक्त होत आहे. मात्र रविवार हा खानापूरचा बाजारचा दिवस आहे.
रविवारी ही शिवस्मारक ते सिंडीकेट बँके पर्यंत भाजी फळ तसेच ईतर विक्रेत्यांना दुकान लावण्यास नगरपंचायत व पोलीसानी आज जबरदस्तीने बंद पाडले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले तसेच आजच्याच दडपशाहीने शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी एक दिवस याठिकाणी बाजार भरविण्यात यावा अशी मागणी शेतकरी नागरीक व व्यावसायिक करत आहेत.
नियम करावेत पण त्यातून जनतेचे नुकसान होऊ नये याची काळजी सुद्धा घेण्यात यावी अशी मागणी होत आहे.