बेळगाव शहर आणि परिसरातील सर्व नेंमदी केंद्र बंद करण्यात आले आहेत .यामुळे उतारे काढण्यासाठी नागरिकांना एजंटांकडे जावे लागत आहे. या एजंटांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू आहे.
उतारा काढण्याची जबाबदारी खाजगी एजंटांकडे देण्यात आली असून उताराच्या पहिल्या पानाला वीस रुपये आणि त्यापुढील प्रत्येक पानाला दहा रुपये याप्रमाणे रक्कम गोळा केली जात आहे .
यामुळे चार ते पाच पाने उतार असल्यास साठ ते सत्तर रुपये देण्याची वेळ नागरिकांवर येत आहे .नेंमदी केंद्रातून कमी दरामध्ये उतारे मिळत होते मात्र हे केंद्र बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांची आर्थिक लूट होऊ लागली आहे. याकडे जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन एजंटांचा सुळसुळाट बंद करावे अशी मागणी होत आहे.