कौटुंबिक वादातून जावयाने सासऱ्याचा चाकूने वार करत खून केल्याची घटना शनिवार खुट येथे शनिवारी रात्री घडली आहे.या घटनेत युसुफ सानवाले (४८) रा.चांदू गल्ली बेळगाव असे मयत झालेल्या सासऱ्याचे नाव आहे.
खडे बाजार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युसूफ सानवाले आणि आरोपी अल्ताफ कारीगर या दोघांत जावई आणि सासऱ्याचे नाते आहे शनिवारी रात्री शनिवार खुट चोंगा जवळून येत असताना त्याला त्याचा जावई अल्ताफ कारीगर रा.शाहूनगर बेळगाव याने जांबियाने सपासप वार करत गंभीर जखमी केले. उपचारासाठी युसूफ यांना इस्पितळात दाखल करण्यात आले मात्र त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला.
सासऱ्याना आपल्या वर जावयाकडून हल्ला होईल याची भीती होती या विषयी त्यांनी पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न शनिवारी सकाळी केला होता मात्र सायंकाळी जावया कडून हल्ला झाला त्यात त्यांचा अंत झाला.खडे बाजार पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.आरोपी जावई अल्ताफ याला खडे बाजार पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलीस निरीक्षक धीरज शिंदे अधिक तपास करत आहेत.