उच्चाधिकार समितीने ताबडतोबड समनव्यक समितीची बैठक बोलवावी आणि 10 फेब्रुवारीच्या आत दिल्लीत सुप्रीम कोर्टाच्या वकिलांची बैठक बोलवावी अन्यथा मुंबई मुक्कामी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने दिला आहे.
शुक्रवारी मध्यवर्ती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेऊन महाराष्ट्र शासनाला इशारा देण्यात आला आहे.सुप्रीम कोर्टातील खटल्या बाबत महाराष्ट्र सरकार उदासीन असून म्हणावा तसा पाठपुरावा केला जात नाही असे निदर्शनास आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी वकिलांशी चर्चा करून त्यांना येणारी अडचण दूर करावी.मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चाधिकार समितीची बैठक घेऊन समस्या दुर करावी यासाठी 10 फेब्रुवारीचा अलटीमेटम देण्यात आला आहे.
बैठकीत मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी ,सरचिटणीस मालोजी अष्टेकर आदींनी सहभाग घेतला होता.