वारकऱ्यांच्या गळ्यातील माळेला जसा धागा एकत्र जोडून ठेवतो जसे कुटुंबाला आई वडील जोडून ठेवतात तसेच शिवाजी महाराज संभाजी महाराज या दोघा पिता पुत्रांनी उभ्या देशाला एकत्रित ठेवण्याच काम केलं आहे त्यांच्या कडून आपण शिकले पाहिजे असे मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी व्यक्त केलं.
बेळगावातील छत्रे वाड्यात आयोजित शिव प्रतिष्ठान च्या बैठकीत बोलत होते.परकीय आक्रमणा विरोधात सिख, राजपूत, बुंदेल, या सर्वांनी झुंज दिली पण त्यांनी आपल्या राज्या पुरता विचार केला पण मराठ्यांनी हिंदवी स्वराज निर्माण करताना संपूर्ण देशाचा विचार करून अगदी दिल्ली पर्येंत झेप घेतली. भरकटलेल्या तरुण पिढीला राष्ट्रीयत्व च्या प्रवाहात आणण्या साठी गडकोट मोहीम हा एक प्रभावी उपक्रम आहे त्यासाठी जास्तीतजास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भिडे गुरुजीनी केले.
येत्या दीड वर्षात रायगड येथे 32 मन सुवर्ण सिंहासन स्थापन करण्याचे उद्दिष्ट्य आहे सुवर्ण सिंहासन च्या रक्षणासाठी रायगड येथे “खडा पहारा” योजने बदल मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हा प्रमुख किरण गावडे, शहर प्रमुख अजित जाधव, तालुका प्रमुख परशराम कोकितकर, शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील,तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील,विभाग प्रमुख, गावप्रमुख, धारकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
गेले एक वर्षात अनेकदा भिडे गुरुजी यांच्या सभा आयोजित केल्या होत्या मात्र बेळगाव जिल्हा प्रशासनाने त्यांच्या वर बंदी घातल्याने सभा होऊ शकली नव्हती मात्र बुधवारी गुरुजींनी शिव प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.