अतिक्रमणे हटवण्या बाबत जसं बेळगावमध्ये तोंड पाहून कारवाई केली जाते ज्याचं राजकीय वजन अधिक ज्याच्याकडे अधिक पैसे त्याचे अतिक्रमण हटवण्यासाठी अधिकारी नरमाईचे धोरण स्वीकारत असतात तोच कित्ता खानापूर नगरपालिका हद्दीत गिरवला जात आहे.
दिवसा ढवळ्या सरकारी जागेत अतिक्रमण केलं जात आहे मात्र याकडे नगरपालिकेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधीनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे खानापुरात ‘पैसेवाले दांडगाईने नगरप्रशासान नरमाईने’अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
खानापूर शहर हद्दीत येणाऱ्या शासकीय मार्गावर काहींनी अतिक्रमण केले आहे घटनेचा सविस्तर वृत्तान्त असा की खानापूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राकडे जाणाऱ्या मठगल्ली ते घोडे गल्ली अप्रोच रोडवर एका महाभगा ने रोडवर आपला प्लॉट आहे असे सांगून जे सी बी च्या साहाय्याने संपूर्ण सरकारी सी सी रस्ता उखडून दिला आहे.तसेच सदर रस्त्याबाजून जाणाऱ्या सरकारी गटारीचे तोडफोड करून संपूर्ण रस्ता व गटारीची नासधूस केली आहे.
सदर इसमाकडे कोणतीही शासकीय परवानगी नसताना हे कृत्य केले गेले आहे .आणि याच व्यक्तीकडून खानापूर मधील सरकारी तळ्याची जागा सुद्धा हडप करून काहींना भाडेतत्त्वावर दिल्याची बाब यापूर्वी निदर्शनास आल्याची माहिती मिळत आहे. सदर व्यक्तिबाबत शहरातील नगरप्रशासन व नगरसेवक मूग गिळून गप्प बसण्याची भूमिका घेत असून सरकारी मालमत्ता हडप कारणे व सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी नगरपंचायतीने फौजदारी खटला घालण्याची मागणी शहरातील नागरिकांतून श्री स्वामी समर्थ केंद्रातील भक्तांकडून होत आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी रस्त्यावर घान टाकून रस्ता अडवला गेला होता सोमवारी रात्री मात्र संपूर्ण गटाराची तोडफोड करून बंद केली आहे आणि काँक्रिट रस्त्याची तोडफोड करण्यात आली आहे.आमदार अंजलीताईनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी जनतेतून व्यक्त होत आहे.