खानापूर नगर पंचायतीने खानापूर येथे चुकीच्या पध्दतीने पदपथ( फुटपाथ) बांधले आहेत. या पदपथाचा वापर अजीबात करण्यात येत नाही. यामुळे फक्त अडचण होत असल्याची तक्रार होत आहे.
सध्या मात्र याचा वापर दोन्ही बाजूचे दुकानदार आपले साहित्य ठेवण्यासाठी करत असून या पदपथामुळे शिवस्मारक ते चव्हाण यांच्या दुकान पर्यंत दोन्ही बाजुला मीळून 15 फुट जागा वाया जात आहे.
याबाबत अनेकवेळा बैठकीत पदपथ काढण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. पोलीसानी ही बंदोबस्त देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे. मात्र हातावरील पोट असणाऱ्यांना मात्र वेठीस धरण्यात येत आहे. जर हा पदपथ काढला तर वाहतुकीची समस्याच मीटते याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
खानापूर येथील या मार्गावरील भाजीविक्रेत्यांनी आज भाजी विक्री बंद ठेऊन आज तहसीलदार निवेदन दिले आहे. चुकीचे निर्णय घेऊन गरीब जनतेला त्रास देऊ नका अशी मागणी होत आहे.