मागील काही दिवसापासून कडोली ग्रामपंचायत अध्यक्षांच्या राजीनामा नाट्याला सुरुवात झालीली आहे. यामुळे यावर कधी शिक्कामोर्तब करण्यात येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. दरम्यान गुरुवारी अध्यक्ष यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे.
गुरुवारी प्रांताधिकारी कविता योगप्पनावर यांच्या अनुपस्थितीत संबंधित अधिकाऱ्याकडे ग्राम पंचायत अध्यक्ष राजू मायना यांनी आपला राजीनामा दिला. ग्राम विकास अधिकारी व इतर सदस्य उपस्थितीत होते.
मागील काही दिवसापूर्वी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्याकडे हा राजीनामा देण्यात आला होता. मात्र आता प्रांताधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आल्याने आता अध्यख पदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पुन्हा नव्याने सदस्याना ओल्या पार्ट्या करण्यासाठी आमंत्रण मिळणार आहे.
आता महराष्ट्र एकीकरण समिती नेते कोणत्या हालचाली करतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेस मधील काही नाराज सदस्यांना धरून आपल्याकडे करून घेतल्यास समितीचा अध्यक्ष होणार मात्र यासाठी कंबर कसण्याची गरज निर्माण झाली आहे. जर समितीचा अध्यक्ष झाल्यास काँग्रेस ला हा मोठा धक्का बसणार आहे.