Tuesday, December 24, 2024

/

स्वामी विवेकानंद स्मृतिस्थळा चे मुख्यमंत्री करणार उदघाटन

 belgaum

स्वामी विवेकानंद आपल्या परिव्रजक काळात १२ दिवस बेळगावला वास्तव्यास आले होते. १६ ते २७ ऑक्टोबर १८९२ याकाळात त्यांनी बेळगावला भेट देऊन दोन ठिकाणी वास्तव्य केले होते.

भातेंचे रिसालदार गल्ली येथील घर आणि हरिपाद मित्रा यांच्या घरी स्वतः स्वामी विवेकानंद राहून गेले ही स्मृती आजही ताजी आहे. त्यांच्या त्या स्मृतिस्थळाची स्मृती जपून ठेवण्यासाठी भाते यांचे ते घर सुधारून जतन करण्यात आले असून ते १ फेब्रुवारी पासून खुले होणार आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या हस्ते उदघाटन होणार असून सलग तीन दिवस विविध कार्यक्रम होतील.

Ramkrishna mission

(नुतनीकरण करण्यात आलेले स्मृती स्थळ)

बेळगावचे प्रसिद्ध वकील सदाशिव बाळकृष्णपंत भाते तथा भाऊसाहेब यांचे ते घर. या वास्तव्याच्या काळात अतिशय लहान शाळकरी मुलगा असलेले भाऊसाहेब यांचे चिरंजीव प्रा गणेश भाते यांनी त्या आठवणी लिहून ठेवल्या असून त्या कलकत्ता येथील अद्वैत आश्रमने प्रकाशीतही केल्या आहेत.
विसाव्या शतकात हे भाते यांचे घर आणखी एक प्रसिद्ध वकील दत्तोपंत बेळवी यांनी खरेदी केले.

१९८७ मध्ये बेळवी यांचे चिरंजीव निवृत्त न्यायमूर्ती बळवंत बेळवी यांनी या घराचा एक तृतीयांश भाग ज्यात स्वामी विवेकानंद राहून गेले तो कारवार येथे वास्तव्यास असलेल्या आणि रामकृष्ण अभियानात काम करणाऱ्या एक समूहाला देऊन टाकले.२००६ मध्ये हा भाग रामकृष्ण मिशनकडे आला आणि तेथे मिशनचे उपकेंद्र सुरू झाले.

swami-vivekanand-memorial-2

स्वामी विवेकानंद जेथे राहून गेले तो भाग जपून ठेवलेला आहे. एक कॉट, मोठा आरसा आणि चालताना वापरण्याची काठी या वस्तूही त्यात आहेत. २०१४ मध्ये रामकृष्ण मिशन ने या घराचा उरलेला भागही दत्तोपंत बेळवी यांच्या नातवाकडून खरेदी केला. यामुळे आता हे संपूर्ण घर रामकृष्ण मिशन च्या मालकीचे आहे.
या घराचे आता स्मृतिस्थळात रूपांतरण करण्यात आले आहे. फेब्रुवारी २०१९ च्या पहिल्या आठवड्यात हे स्मृतिस्थळ खुले होणार आहे. सध्या शिल्लक असलेल्या कामांसाठी १ कोटींची रक्कम अपेक्षित असून याद्वारे स्वामी विवेकानंदांच्या वस्तूंचे प्रदर्शन याठिकाणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.