Friday, October 18, 2024

/

कार कालव्यात बुडाली पाच जणांना जल समाधी’

 belgaum

संक्रातीच्या दिवशी बेळगाव जिल्ह्यातून ब्रेकिंग न्यूज आली असून कार गाडी कालव्यात बुडल्याने पाच जणांना जल समाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री घडली आहे.सौन्दत्ती तालुक्यातील मुरगोड तालुक्यातील कडबी शिवापूर गावाजवळ कार रस्त्या शेजारील कालव्यात बुडाल्याने या घटनेत पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

सोमवारी रात्री 10 च्या सुमारास हा घटप्रभा नदी वरील  कालव्यात हा अपघात झाला असून कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडलीय यात पाच जणांना जीव गमवावा लागला आहे मात्र या घटनेत सुदैवाने कार चालकाने आपला जीव वाचवून घेतला आहे चालक अडव्यापा माळगी हा या अपघातात बचावला आहे.

अंतिम संस्कार आटोपून परतते वेळी हा अपघात झाला असून या घटनेत फक्कीरवा पूजेरी(29) हनुमंत पुजेरी(60) लगमाना पूजेरी(38 पारव्वा पूजेरी (50)लक्ष्मी पूजेरी (40)अशी मयतांची नावे आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तीन मयतांची शव बाहेर काढली आहेत.रात्री उशिरा झाल्याने पाण्यात वाहून गेलेले शव शोध कार्य बंद करण्यात आले होते उर्वरित दोन शव सकाळी शोधले जाणार आहेत.घटनास्थळी मुरगोड पोलीस ठाण मांडून आहेत या प्रकरणी मुरगोड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.