पहिल्या रेल्वे गेट रोड वरील बॅरिकेट्स हटवण्यासाठी कित्येक दिवस आंदोलन सुरू आहे मात्र जन हितासाठी ते बॅरिकेट्स हटवले जाणार नाहीत.पोलीस खात्याने शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ते बॅरिकेट्स जैसे थे रहातील असं म्हटलं आहे.रहदारी नियंत्रण जनतेची सुरक्षेसाठी बॅरिकेट्स हटवणार नसल्याचे देखील नमूद केलं आहे.
या बॅरिकेट्स मुळे देशमुख रोड कडून पहिल्या रेल्वे फाटका कडे येणाऱ्या वाहनांना काँग्रेस रोड वर येण्यासाठी दुसऱ्या गेट कडून वळसा घालून यावे लागत आहे याशिवाय मंडोळी रोड कडून येणारी वाहनांना त्रास होत आहे.
(File photo of first gate barricates)
पाहिले रेल्वे फाटक हे जंक्शन असून या भागात अति रहदारी सुरू असते गोव्याकडे जाणारे अवजड वाहने यांचा समावेश असतो असेही पोलीस आयुक्तांनी दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. रेल्वे उड्डाण पूल बांधलं असले तरी मंडोळी रोड,चौगुलेवाडीरोड वर रहदारीचा ताण असणार आहे.
देशमुख रोड आणि बसवेश्वर चौक मधील बॅरिकेट्स काढले जातील असे पत्रकात कळवण्यात आले आहे.
गर्दीत गर्दी करणाऱ्या रिक्षावर कारवाई
मर्यादेपेक्षा अधिक विद्यार्थी गर्दीच्या रिक्षात घातलेल्या शहरातील 89 ऑटो वर गुन्हे घालून कारवाई केली असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. बेळगाव शहरात गर्दीत गर्दी करणाऱ्या ऑटो गुन्हा घालायची विशेष मोहीम हाती घेत पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचे म्हटले आहे.