Friday, November 15, 2024

/

‘बेळगावात भरणार कुस्तीचा ‘सण’ दंगल नव्हे’

 belgaum

महाराष्ट्र केसरीच्या धर्तीवर कुस्ती खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कर्नाटकात कुस्ती सण साजरा केला जाणार आहे.वन मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या पुढाकारातुन तीन दिवस हा सण आगामी फेब्रुवारीत बेळगावात साजरा केला जाणार आहे.

क्रीडा युवजन खात्याच्या वतीनं हा कुस्तीचा सण 8,9 आणि 10 फेब्रुवारी रोजी नेहरु स्टेडियम वर आयोजित केला जाणार आहे.हजारोंच्या संख्येने ज्युनिअर सीनियर कुस्ती खेळाडू या सणात सहभागी होणार आहेत.

वनमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शनिवारी क्रीडा युवजन खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली होती.बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले की या सणाला राज्य सरकारने 2 कोटी अनुदान मंजूर केले असून त्यातील 80 लाखांची बक्षिसे तर उर्वरित 1 कोटी 20 लाख जेवण राहणे सणाच्या तयारीसाठी खर्च करण्यात येतील. जॉर्जिया आणि इराण येथील दोन महिला दोन पुरुष पैलवानांना आमंत्रित केले जाणार आहेत जे मॅट वरील कुस्तीत प्रसिद्ध असतील .हार जीत(चित पट) आणि गुणा वर आधारित अश्या दोन्ही प्रकारच्या दंगल खेळवल्या जातील असेही त्यांनी सांगितले.

Wrestling

(File photo phogat asian games 2018)

बेळगाव भागात प्रसिद्ध असलेल्या हार जीत(चित पट) कुस्ती प्रकार जास्त संख्येत आयोजित करण्यात यावा हा प्रकार या भागात  जास्त लोकप्रिय अशी सूचना खासदार प्रकाश हुक्केरी यांनी केली.  या प्रकारासाठी खासदार निधीतून मदत करण्याची त्यांनी तयारी दर्शवली.

जर महापालिका निवडणुकीची आचार संहिता लागल्यास सदर कुस्तीचा सण रद्द करावा लागेल अशी शंका व्यक्त केली त्यावर मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सदर कुस्त्या साठी कडोली गावात आयोजन करावे कारण ग्रामीण भागात आचार संहिता लागू होणार नाही अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. या शिवाय या दंगल साठी जेवण राहण्याची आयोजनाची सोय अत्त्युत्तम दर्जाची करा अश्या सूचना देखील दिल्या.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.