स्मार्ट सिटी योजनेत कोट्यवधी रुपयांचा निधी शिल्लक आहे योग्य रित्या निधीचा वापर होताना दिसत नाही यात भरपूर तफावत आहे त्यामुळे या योजनेचा विनियोग करताना माजी नगरसेवकांना देखील विश्वासात घेऊन त्यांची देखील मते जाणून घ्या अशी मागणी माजी नगरसेवक संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे.
सोमवारी दुपारी माजी नगरसेवकांच्या एका शिष्टमंडळाने महा पालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे एम डी एम शशिधर कुरेर यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले. बेळगाव शहरात कोणतेही प्लॅनिंग नसताना रस्त्यांची खुदाई करण्यात येत असून महा पालिकेचे इतर खात्या सोबत समन्वय नाही.
पी डब्ल्यू डी,टेलिफोन,हेस्कॉम आणि पाणी पुरवठा खात्याकडून होणाऱ्या रस्ते खुदाईमुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे अनेक खड्डे निर्माण झालेत या शिवाय पाणी पुरवठा खाते आणि व्हॉल्वमन कडून होणाऱ्या खुदाई मुळे दूषित पाणी पुरवठा होत आहे. महा पालिकेने इतर खात्यांशी समनव्य साधावा अशी मागणी देखील केली.
शहरातील कचरा निवारण समस्या सोडवून भटक्या कुत्र्यावर देखील नियंत्रण आणा नागरिकांना भेडसावणाऱ्या शहरातील विविध समस्या सोडवा असेही निवेदनात म्हटले आहे.यावेळी माजी महापौर सिद्दंनगौडा पाटील,माजी महापौर मालोजी अष्टेकर,शिवाजी सुंठकर,माजी नगरसेवक नेताजी जाधव,दीपक वाघेला नीलिमा पावशे,शांतीनाथ बुडवी,धनराज गवळी,फिरदोस दर्गा.महंमद पिरजादे,संजय प्रभू आदी उपस्थित होते.विद्यमान नगरसेवकांचे मत ऐकायला मागे पुढे बघणारे पालिकेचे अधिकारी माजी नगरसेवकांचे ऐकतील का?