जेष्ठ कन्नड पत्रकार आणि कर्नाटक एकीकरण चे नेते पाटील पुट्टप्पा यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला आपण अजिबात जाणार नाही असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनी केला आहे.यासंदर्भात कोणत्या प्रकारचे वृत्त आले असल्यास आपण जबाबदार नसून आपल्याला आमंत्रण असले तरी आपण या कार्यक्रमाला जाणार नाही अशी माहिती त्यांनी बोलताना दिली.
ते कडोली येथील शिवाजी महाराजांच्या पुतळा उदघाटन कार्यक्रमाचत आले असता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांनी पवार यांची भेट घेतली त्यावेळी वरील माहिती दिली आहे.बेळगाव live ने देखील याबाबत पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
काही कानडी माध्यमातून पवार सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार असे वृत्त दिले होते त्यावर बेळगाव live सर्वप्रथम बातमी देऊन पाठपुरावा केला होता या नंतर पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.