अभियंता बनून त्याने केले आपल्या समाजाचे नाव उज्वल

0
430
Lakhe
 belgaum

डोंबारी समाजातील आकाश लाखे हा पहिला इंजिनिअर

जीवनात प्रत्येकास आव्हानाना सामोरे जावे लागते परंतु यश मिळवण्याच्या दुर्दम्य ईच्छाशक्तीमुळे अनेक अडचणींवर मात करून यशस्वी होणे ही तितकी सोपी गोष्ट नाही. पण रोज प्लास्टिक, पुठ्ठे,भंगार गोळा करून आपली उपजीविका चालवणाऱ्या कुटुंबात जन्माला आलेला आकाश लाखे हा तरुण त्याला अपवाद आहे.घरची हलाखीची परिस्थिती, घरी कोणीच शिक्षित नाही. त्यांच्या समाजात फारसं कुणीच उच्च शिक्षित नसताना फक्त आणि फक्त स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर बीई इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी संपादन केली आणि या अशिक्षित समाजातील पहिला इंजिनिअर होण्याचा मान आकाशने मिळविला.

Lakhe

 belgaum

उच्च शिक्षण घेण्याची जिद्द आणि कठोर परिश्रमामुळेच आकाश हा डोंबारी समाजातील एक विद्यार्थी इंजिनिअर होऊ शकला.

त्याच्या पावलावर पाऊल ठेऊन त्याची बहीण सुध्दा इंजिनिअरिंग चे शिक्षण घेत आहे.

त्याच्या या कामगिरीचे कौतुक करून आकाशचा जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनच्या वतीने अध्यक्ष सुनील भोसले यांनी शाल, श्रीफळ,स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला.
याप्रसंगी आकाश लाखे ला मोहन सर्वी,प्रकाश कदम सुनिल भोसले, प्रदिप चव्हाण आणि अशोक हलगेकर यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.