बेळगाव महानगरपालिकेच्या वॉर्डांची पुनर्रचना आणि आरक्षण बदलासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयात घालण्यात आलेल्या दाव्याची सोमवारी सुनावणी झाली मात्र पुन्हा 29 रोजी पुढची तारीख देण्यात आली आहे.
सोमवारी झालेल्या सुनावणीत नगर विकास प्रशासनाच्या वकिलांनी तोंडी कोर्टा समोर आपली बाजू मांडली आहे त्या नंतर याचिका कर्त्या वकिलांनी देखील आपली बाजू मांडत वॉर्डांची पुनर्रचना आणि आरक्षण बदला अशी विनंती केली आहे त्यावर आता 29 जानेवारी रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.
सध्या उच्च न्यायालयाने महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेवर स्थगिती आणली असून जोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत निवडणूक भवितव्य अंधारात आहे.
माजी नगरसेवक धनराज गवळी यांच्या नेतृत्वाखाली आजी-माजी नगरसेवकानी हा दावा दाखल केला आहे .महानगरपालिकेने अतिशय चुकीच्या पद्धतीने वॉर्ड पुनर्रचना केल्याचे त्यांचे म्हणणे असून या संदर्भात न्यायालयाने निकाल द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर आरक्षण बदल करताना सुद्धा चुकीचे निर्णय घेण्यात आल्याचा आरोप या दाव्यामध्ये आहे. आता 29 रोजी यावर निर्णय होणार आहे.
सोमवारी झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलाने कोर्टा समोर हरकत तोंडी नोंद केली आहे.सरकारी वकिलांना या याचिकेवर बंगळुरू उच्च न्यायालयात कोर्टा समोर माहिती द्यायची आहे पुढील सुनावणी 29 रोजी होणार असल्याची माहिती याचिका कर्ते वकील धनराज गवळी यांनी बेळगाव live शी बोलताना दिली.