Saturday, January 4, 2025

/

एप्रिल पासून दररोज बेळगावातून कार्गो सेवा-विमान खाते विविध संघटनांची बैठक  

 belgaum

बेळगावातील 80 टक्के भाग शेती प्रधान आहे सुपीक जमिनी आहेत या भागातला शेतकरी एका वर्षात तीन प्रकारची पीक घेत असतो इथल्या शेतकऱ्यांना निसर्गाचं देण असून तो स्वतः वर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेती मालाला किती किंमत मिळते याची कल्पना आहे मार्केट मध्ये गेल्यास किती दलाली खर्च होते याबद्दल हमीभाव योग्य मिळत नसतो यासाठी शेतकऱ्यांचा कार्गो विमाना द्वारा शेतातून थेट मोठया बाजारपेठेत जाणार आहे यामुळे कार्गोला पूर्णपणे पाठिंबा दिल्याची माहिती शेतकरी संघटनेच्या वतीनं सिटीझन कौन्सिलने दिली.

गुरुवारी साम्बरा विमानतळावर विमान तळ प्राधिकरणाच्या वतीनं विविध संघटनांची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत सिटीझन कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी कार्गो आणि शेतकरी बद्दल अहवाल सादर केला.

विमान उड्डाण खात्याच्या आर सी एस 2 योजनेत कार्गो सेवेतून शेती माल पाठवणाऱ्या शेतकऱ्यांना सबसिडी देणार आहे त्यामुळे विमान सेवा महागडी ठरणार नसुन बेळगावसाठी जमेची बाजू ठरणार आहे. विमान प्राधिकरणाने शेतकऱ्यांना लोडिंग अनलोडिंग कार्गोची पद्धत कशी असते याबद्दल माहिती पुरवत प्रशिक्षण दिल्यास शेतकरी पुढाकार घेतील अशी देखील सूचना केली.या भागातील फुलं फळे भाज्या विदेशात जात आहेत त्यांना म्हणावा तेवढा भाव मिळत नाही या भागातील शेतकरी कार्गो सेवा वापरायला राजी आहे अंदाजे दररोज 60 ते 70 टन बेळगावातुन कार्गो मिळू शकतो असा शेतकऱ्यांच्या बद्दल चा अहवाल सादर केला.

Airport cargo

दोन वर्षापूर्वी सिटीझन कौन्सिलने तत्कालीन विमान उड्डाण मंत्री गजपती राजू यांना सर्वप्रथम निवेदन देऊन कार्गो विमानसेवा सुरू करण्याची गरज व्यक्त केली होती.भारतीय विमान उड्डाण प्राधिकरणाचे कार्गो विभागाचे अधिकारी गोकुळ यांनी सिटीझन कौन्सिलच्या अहवालाचे कौतुक करत हा अहवाल मंत्रालयात पाठवून देत कार्गो लवकरच सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा कार्गोला पूर्णपणे पाठिंबा असल्याने आगामी 15 मार्च किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून दररोज कार्गो सेवा सुरू करणार आहेत.ज्या कार्गोची क्षमता चार टन असते.या कारगो मध्ये 40 किलोच्या पोत्यानी माल पाठवू शकतात अशी माहिती एअर पोर्ट अधिकारी राजेश कुमार मौर्य यांनी दिली. डॉ अशोक आलूर यांनी कौशल्य विकास मंत्रालयाच्या होर्टिकल्चर आणि कोल्ड स्टोरेज कार्गो प्रस्ताव बद्दल माहिती देत लवकरच सरकार ग्लोबल अव्हिएशन संमेलनात कार्गोची नियमावली ठरवणार असल्याची माहिती दिली तर कार्गो अधिकारी गोकुळ यांनी बेळगाव विमान तळाच्या जुन्या टर्मिनल बिल्डिंगचे डोमेस्टिक कार्गो बिल्डिंग मध्ये परिवर्तन करणार असल्याचे स्पष्ट केले. आढाव्यात सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना आपली मते मांडली या सगळ्यांचे या सेवेचा दर कमी असावा असे मत होते. यात चेंबर ऑफ कॉमर्स,प्रोफेशनल फोरम अनेक कॉलेज प्राध्यापक,संस्थाचे पदाधिकारी शेतकरी नेते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.