बुडाने कणबर्गी येथील पिकाऊ शेत जमीन वसाहतीसाठी संपादित करण्याचा प्रयत्न केल्यास सामूहिक रित्या गळफास घेऊन आत्महत्या करू असा इशारा कणबर्गी गावच्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिला आहे.
मारुती पाटील आणि बबन मालाई शेतकऱ्यांनी आपापल्या घरासमोर दोरखंडाचे फास तयार करून ठेवले आहेत. जमिनीला हात लावला तर संपूर्ण कुटुंबातील सदस्य फास लावून घेऊ असा इशारा दिला असून या फासात डोकी अडकवून त्याचे फोटो काढून मीडिया ला देण्यात आला आहे.
हे फोटो सध्या सगळीकडे पसरत असून गोंधळ माजला आहे. बुडाच्या अन्यायाला कंटाळून शेतकरीवर्गाने हा पवित्रा घेतल्याने खळबळ माजली आहे.सात मार्च 2018 रोजी एकदा याच कुटुंबाने समूहिक आत्महत्येचा इशारा दिला होता त्यानंतर सात महिन्यांनी असा इशारा देण्याची ही दुसरी खेप आहे.
बुडा अंतर्गत स्कीम नंबर 61 मध्ये जमीन संपादन करण्याचा घाट घातला असून या बाबत हाय कोर्ट स्थगिती असताना देखील बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे ही जमीन संपादन करण्याचा घाट घालत आहेत पहाणी करत आहेत असा आरोप शेतकऱ्यांनी बेळगाव live कडे बोलताना केला आहे.या शेतकरी कुटुंबा कडे लोक प्रतिनिधी लक्ष देतील का?हा प्रश्न आहे.