शंभर दशलक्ष डॉलर हुन अधिक उलाढाल ,जगभर चार हजार शाखा आणि अडीच लाख कर्मचारी असलेल्या बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदी बेळगावचे सुपुत्र श्रीनिवास सामंत यांची निवड झाली आहे. बँक ऑफ अमेरिकेच्या या पदाची सूत्रे त्याने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात स्वीकारली. श्रीनिवास गेली तेरा वर्षे संचालक म्हणून काम पाहत होते त्यांचे टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट चे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. त्याबरोबर जगभरातील लहान राष्ट्रांना कर्ज मंजुरीचे काम त्यांच्याकडे आहे.
बेळगाव समाचारचे सदानंद सामंत यांचे ते जेष्ठ चिरंजीव आहेत .श्रीनिवास यांचे प्राथमिक शिक्षण सेंट जेवियर्स स्कूल मध्ये तर महाविद्यालय शिक्षण जी एस एस कॉलेजमध्ये झाले. प्रथमपासूनच ते एक हुशार विद्यार्थी म्हणून परिचित होते दहावीच्या परीक्षेत प्रथम आले बारावी ९२ टक्के गुण मिळवून यश मिळवले होते.
पुढे सुरतकल इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी ही पदवी संपादन केली .
ते अमेरिकेला गेले युनिव्हर्सिटीमधून शिक्षण झाल्यावर कंपनीत दोन वर्षे नोकरी केली फायनान्स कंपनीत दाखल झाल्यावर ते बँकेचे कर्मचारी झालेल्या वर्षांपासून त्या बँकेचे संचालक म्हणून काम पाहत आहेत .
शिक्षण सुरू असताना च त्यांना खेळाची आवड होती कॉलेजमध्ये असताना ते एनसीसी त होते. कॉलेजमधील स्वामी विवेकानंद वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता.
शाळकरी जीवनातील विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे सेंट झेवियरच्या क्रिकेट संघातून खेळत होते .बॉल बॅडमिंटन स्पर्धेत शहरात प्रथम क्रमांक मिळवला होता. सध्या अमेरिकेतील सॉमरसेट काउंटी बॅडमिंटन क्लबचे सदस्य आहेत. लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकूर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले