बेळगाव शहरात क्रीडा क्षेत्रात तरुण मोठे यश मिळवत आहेत. येथील केएलई इंटरनॅशनल शाळेचा दहावीचा विद्यार्थी मंदार मारुती देसुरकर याला यंदाचा कर्नाटकाचा टॉप स्पोर्ट्स टॅलेंट ऑफ कर्नाटका हा किताब देऊन गौरविण्यात आले आहे.
गॅमाटिक्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगलोर यांच्यावतीने स्पोर्ट टॅलेंट एक्स्प्लोरेशन अंड प्रमोशन या कार्यक्रमांतर्गत त्याला गौरविण्यात आले आहे तीन जानेवारीला बेंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमात कर्नाटकातील यशस्वी क्रीडापटूंना वाव देण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
मंदार हा बेळगावचा उदयोन्मुख जलतरणपटू असून त्याची मागील वर्षी इस्राईल येथे फिना ज्युनियर वॉटर स्विमिंग चॅम्पियनशीप साठी निवड झाली होती त्याने या स्पर्धेत कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले होते इतकेच काय तर हुगळी (गंगा) नदीच्या खाडीत बाजी मारली होती.
गेल्या डिसेंम्बर महिन्यात त्याने स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि अहिरोतीला स्विमिंग क्लबच्या वतीनं आयोजित 14 किलो मीटर लांब स्विमिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला होता. या सर्व वरील यशामुळे त्याला टॉप स्पोर्ट्स टॅलेंट चा ‘किताब मिळाला आहे.अभिनंदन मंदार टीम बेळगाव live कडून मंदारला शुभेच्छा