शिवसेना प्रमुख आणि शिवसेना या दोन शब्दांची क्रेज केवळ जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांतूनच नाही तर आजच्या पिढीतील युवकांना देखील तितकेच आहे हे आज बेळगावात पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे.तिकीट नाही मिळालं तर काय झालं खुर्ची नाही मिळाली तर काय झाली पहिला दिवस अन पहिला शो युवकांनी चक्क जमिनीवर बसून पाहिलाय…
शुक्रवारी बेळगावात ठाकरे रिलीज झाला स्वागत देखील दणक्यात झालं मात्र शो फुल्ल झाल्याने अनेक कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही.त्यांनी नाराज न होता हा पूर्ण चित्रपट जमिनीवर बसून पाहिला आहे. थिएटर संचालक महेश कुगजी यांनी त्या युवकांना विना तिकीट चित्रपट पहायला दिला.
प्रकाश थिएटर समोर पहिल्या शो शेकडो मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती शो फुल्ल असल्याने हौशी ठाकरेप्रेमी मराठी भाषिक युवकांनी चक्क खाली बसून चित्रपट पाहिला.खुर्ची न मिळाल्याने अनेक जणांना तिकीट मिळालं नव्हतं शेवटी त्यांनी पायऱ्यांचा वापर करत पूर्ण चित्रपट पहिला. या मुळे आजही बेळगावात बाळासाहेबांवर प्रेम करणारे युवा चाहत्यांची कमी नाही आणि शिवसेने साठी हेच भविष्य आहे.