शिव सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बेळगाव शहरात विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेच्या वतीने बापट गल्लीतील वयोवृद्धांचा सत्कार करण्यात आला रामदेव गल्ली येथील राम मंदिरामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राम मंदिरमध्ये पूजा व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यावेळी वकील अशोक पोतदार आणि उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजन केले .शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि बेळगावचं नात अगदी अतूट आहेया संबंधा बद्दल बंडू केरवाडकर यांनी माहिती दिली.
सेनाप्रमुखांना बेळगाव बद्दल किती लळा होता हे त्यांनी यावेळी पटवून दिले.दशरथ मिसाळ,सुमित्रा मिसाळ गोपाळराव केसरकर आशा केसरकर मारुती मुरकुटे शोभा मुरकुटे मनोहर नरगुंदकर रेखा नरगुंदकर महादेव किल्लेकर सुनंदा किल्लेकर सत्कार या वेळी करण्यात आला यावेळी उप शहर प्रमुख राहुल भोसले, महेश कातकर उदय पाटील राम जाधव नरेंद्र भरत जाधव विजय गव्हाणे शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.