बेळगाव जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अधिकारी डॉ रामचंद्र राव यांची बागलकोट जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.
गेल्या दोन वर्षात त्यांनी राज्यातील सर्वात मोठ्या बेळगाव जिल्हा पंचायतीचा कार्यभार स्वीकारताना जन सामन्यात लौकिक मिळवला होता. 2016 मध्ये कोप्पल हुन ते बेळगावला आले होते हागणदारीमुक्त जिल्हा,उद्योग खात्री योजना,ग्राम सडक पिण्याचे पाणी आदी योजना यशस्वी राबवल्या होत्या.
एस एस एल सी पी यु सी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना प्रोत्साहित केले होते इतकेच काय तर सतत जन संपर्कात राहून आरोग्य योजना देखील यशस्वी राबवण्याचा प्रयत्न केला होता.स्वतः सायकल चालवणे जनतेची कामे स्वतः थांबून करवून घेणे अशी अनेक जन माणसांची कामे केली होती त्यामुळे ते लोकप्रिय अधिकारी बनले होते.