बेळगाव शहरामध्ये थंडीचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रात्रीच्या वेळी कुडकुडत झोपण्याची वेळ बेळगावच्या नागरिकांवर आली आहे. अशावेळी बस स्थानक तसेच रेल्वेस्थानक व इतर परिसरात उघड्यावर झोपण्याची वेळ येणाऱ्या नागरिकांची काळजी घेण्याची वेळ आहे.
पोलीस आणि आरोग्य खात्याने याकडे लक्ष द्यावे लागणार आहे बेळगाव शहरात वेगवेगळ्या भागातून नागरिक येतात रात्रीच्या वेळी प्रवासाची सोय उपलब्ध झाली नाही की त्यांना उघड्यावर झोपावे लागते अशा वेळी थंडी वाढून गारठवून आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असेल अशा लोकांना रात्रीच्या वेळी आधार देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. याकडे लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक संघटना तसेच बेळगाव live च्या माध्यमातून करण्यात येत आहे.
दिल्लीसारख्या शहरांमध्ये थंडीमध्ये गारठून मृत्यू होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत अशा घटना बेळगाव मध्ये घडू नयेत म्हणून प्रयत्न करून उघडयावर झोपणाऱ्यांना आसरा द्यावा अशी गरज आहे.