फिनिक्स स्कुलजवळ तीन दुकाने फोडून २४५०० चा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीला आली आहे. या भागात चोरांचा सुळसुळाट वाढल्याने आता पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
एक मेडिकल दुकान, एक झेरॉक्सचे दुकान आणि एक जनरल सामानाचे दुकान वरचे पत्रे काढुन चोरट्यांनी फोडले व आतील रोख रक्कम व साहित्य चोरले आहे.
ही घटना शनिवारी उशिरा रात्री घडली असल्याचा संशय आहे. चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. आता अश्या घटना घडू नये म्हणून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.