गेल्या चार महिन्यापासून पगारापासून वंचीत असलेले सफाई कर्मचारी गुरुवारी देखील आक्रमक झाले आहेतच.बुधवारी अनेक भागात रस्त्यावर कचरा टाकून जिल्हाधिकारी आणि पालिके समोर ठिय्या आंदोलन करून आपली मागणी शासना पर्यंत पोचवली होती मात्र या प्रकरणी अद्याप तोडगा न निघाल्याने ठीक ठिकाणी सफाई कामगार कचऱ्याची उचल न करून आंदोलन करत आहेत.
खडक गल्ली जालगार गल्ली चव्हाट गल्ली खडे बाजार भागातला गुरुवारी कचरा जश्यास तसा आहे.ज्या सफाई कामगारांचा गेल्या चार महिन्यापासून पगार झाला नाही त्यांचे आंदोलन सुरू असून त्यांनी कचऱ्याची उचल केलेली नाही.
एकीकडे कचरा उचल बंद आंदोलन सुरु असताना गुरुवारी सकाळी चव्हाट गल्ली येथील कचऱ्याची उचल करण्यासाठी पालिकेचे जे कायमस्वरूपी नोकरीला असलेले सफाई कामगार आले असता पगार न झालेल्या आंदोलक सफाई कामगारांनी त्यांना कचऱ्याची उचल करायला दिली नाही त्यामुळे यावेळी सफाई कामगारात संघर्ष झाला होता.
सकाळी पोलिस बंदोबस्तात घेऊन कचरा काढण्याचा प्रयत्न झाला मार्केट ए सी पी एन व्ही भरमनी यांनी दोन्ही सफाई कर्मचाऱ्यांत समेट करून कचरा उचली साठी प्रयत्न केले मात्र उपास मारी भोगत असलेले कामगारांनी उचल करायला दिलीच नाही.स्मार्ट बेळगावची ही दशा आहे त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.