(राशीस्वामी- शुक्र)
||सौख्यदायी कालखंड ||
वृषभ राशी वैशिष्ट्ये
वृषभ ही कालपुरुष कुंडलीतील दुसऱ्या क्रमांकाची राशी आहे. या राशीचा अंमल मुख्यत्वेकरून मान, घसा, मुख,कंठ व नेत्रावर असतो.ही स्थिर व पृथ्वीतत्वाची राशी असून सम राशी असल्याने सौम्य आहे. राशी स्वामी शुक्र असल्याने या राशीच्या व्यक्तींमध्ये स्त्री तत्वाचे गुणधर्म आढळतात. उत्साही, समजूतदार, शांत, लाजाळू, दिर्घोद्योगी, काम करण्याची धम्मक असते. सहनशील, आशावादी तसेच कुटुंबाची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडणाऱ्या असतात. तसेच पिलासी, रसिक, आधुनिक राहणीमानाच्या, आकर्षक व्यक्तिमत्वाच्या हसतमुख व व्यवहार ज्ञानाने परिपूर्ण व्यक्ती आढळतात.
स्वभाव वैशिष्ट्ये
स्वामित्व दक्षिणेला असते, ही पृथ्वीतत्वाची स्थिर रास असल्याने एक ठिकाणी स्थिर राहणे यांना आवडते. विशेष करून स्थिर व्यवसायात हे लोक असतात. शेतीसारखे व्यवसाय, फुलांची शेती तसेच सौन्दर्य क्षेत्राशी संबंधीत नोकरी व्यवसाय, कला, नाट्य, वस्त्रोद्योग, रंगकाम या क्षेत्रात हे लोक विशेष दिसून येतात. विपरीत परिस्थिती असली तरी सतत हसतमुख असतात. या राशीच्या व्यक्तींना विशेष करून गळ्याचे, मानेचे विकार, अन्न व श्वास नलिके संबंधींचे विकार आणि टॉन्सिल, घटसर्प, गंडमाळ, घशात कफ साचणे, मानेच्या मणक्यासंबंधी आजार उद्भवतात.
वार्षिक ग्रहमान
वृषभ राशीच्या व्यक्तींना मागिल वर्ष देखील उत्तम होते. यावर्षी देखील तुम्हाला सुखद अनुभव देणारे वर्ष ठरेल. कारण आपल्या राशीच्या सप्तम स्थानात असणारा गुरू आपल्या राशीला पाहतो आहे. गुरुची सप्तम दृष्टी असल्याने बरीच कामे यावर्षी मार्गी लागतील.
येणारा जानेवारी फेब्रुवारी महिना आपणास अति उत्तम राहील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील ज्याचे विवाह जमले नाही अशांना वैवाहिक सौख्य लाभेल. ज्या व्यक्ती परदेशी जाण्याचा विचार करतील अशांना परदेश गमनाचे योग येतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. स्त्रियांना कोटुंबिक सौख्याच्या दृष्टीने चांगला काळ राहील. घरात आनंदाचे वातावरण राहील तसेच याकाळात प्रॉपर्टी संबंधी काही शुभंकर घटना घडतील. नवीन घर किंव्हा जमीन खरेदीचे योग येतील. आपले घराचे स्वप्न पूर्ण होईल. परंतु तृतीयात असणारा राहू बंधू भगिनी मध्ये दुरावा निर्माण करणारा राहील. कानाचे त्रास निर्माण करेल तसेच शेजाऱ्यांशी विशेष जमणार नाही. राहुला हे स्थान चांगले असल्याने तो सुख विलासाची प्राप्तीही आपणास करवून देईल. ५ फेब्रुवारीला मंगळ मेषेत प्रवेश करेल. २२ मार्च पर्यंत तो तिथे राहील. याकाळात आपणास गुप्त शत्रूचा त्रास जाणवेल.
मार्च एप्रिल महिना हा आपणास बरेच उतार चढाव दाखवेल. कारण व्ययात मंगळ हर्षल योग डोळ्यासंबंधी विकार देईल. तसेच याकाळात आपण चोरी होणे पैशाच्या अडचणी निर्माण होतील. विशेष करून याकाळात महिलांनी दागिने, पैसे प्रवासात सांभाळावे. याकाळात उधारी उसनवारी करणे टाळावे. तरुण वर्गाने याकाळात कुठल्याही कुमार्गाचा अवलंब करू नये. स्वतःच्या चुकीमुळे संकटात पडण्याची शक्यता असते. व्यापारी लोकांनी याकाळात पैशाचे व्यवहार जपून करावे. कर्ज काढू नये. हर्षल मंगळ योग दिवाळे काढतो. व्यापारात नुकसान करवितो. २२ मार्चला हा मंगळ आपल्या राशीत प्रवेश करेल. तो पर्यंतचा काळ थोडा त्रासदायक राहील.
आपल्या राशीतील मंगळ याकाळात धैर्य, आत्मविश्वास व साहसी वृत्तीत वाढ करेल. त्यामुके कामाला गती येईल. कामाचा उरक वाढेल. वयस्कर मंडळींनी प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी.याकाळात आपण जास्त व्यवहारिपणे वागाल.
मे जून याकाळात मे महिन्यात आपल्या राशीतून मंगळ पुढे गेलेला राहील. उत्तरार्धात रवी आपल्या राशीत प्रवेश करेल. परंतु सुरुवातीला ७ तारखेला मंगळ आपल्या राशीच्या द्वितीयात जाईल. तिथे मंगळ राहू एकत्र येतील. त्यामुळे आपल्या जिभेवर ताबा राहणार नाही. बोलताना तोल जाईल. यामुळे कुणाची मने दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्या.
जुलै महिन्यात कर्कचा बुध मंगळ हा आपणास तितका शुभकारक नाही. प्रवासात त्रास होतात. परंतु लेखन राजकारणी व्यापारी लोकांना तो बारा आहे. बुध, मंगळ युती बढाईखोरपणा निर्माण करते. १६ जुलै ला होणारे चंद्रग्रहण आपल्या राशीला चांगले नाही. त्यामुळे याकाळात गर्भवती महिलांनी ग्रहण पाहू नये.
ऑगस्ट महिन्यात येणार द्वितीयात बुध राहू आर्थिक बाबतीत थोडा खर्चीकपणा देईल. याकाळात नको त्या मोहाला बळी पडू नये. खरेदी विक्री व्यवसायात घोटाळे होण्याची शक्यता मोठी आहे.
सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात आपणास संततीच्या बाबतीत काही चांगली बातमी देणारा काळ आहे. तरुण वर्गाला शैक्षणिक दृष्ट्या काळ चांगला आहे. याकाळात व्यापारी वर्गाला पैशाची आवक चांगली राहील स्त्रियांना खरेदीचे योग येतील तर कला क्षेत्रातील लोकांना प्रगतिकारक काळ राहील.
नोव्हेंबर महिन्यात गुरू आपल्या राशीच्या अष्टम स्थानात प्रवेश करेल. याकाळात अध्यात्मिक बाबतीती गुरू चांगली फळे देईल. आपणास वारसा हक्काने संपत्ती मिळण्याचा अथवा एखादे लॉटरी अथवा बक्षीस रुओणे धन संपादन होण्याचा संभव आहे किंव्हा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा लाभ मिळेल.
वर्षाचा अखेर म्हणजेच डिसेंबर महिना उत्तम जाईल. भाग्यातील शुक्र वर्ष अखेरीस शुभकारक फळे देऊन जाईल. सौख्यप्राप्ती होईल. आपल्या हातून धार्मिक कृत्य घडतील. मानसन्मान मिळेल. मित्रांकडून लाभ होईल. लांबचे प्रवास घडतील. नोकरी संबंधी परदेश गमनाचे योग येतील.
काही महत्वाचे
# मेष राशीतील नक्षत्रे: कृतिका, रोहिणी, मृग
# कृतिका स्वभाव : विध्यानिपुण , चतुर, नाम अक्षर : आ, इ, उ, ए
# रोहिणी स्वभाव : शांत, प्रसन्न, दिर्घोद्योगी नाम अक्षर : ओ, वा, वी
# मृग स्वभाव : चंचल, विवेकी नाम अक्षर : वे, वो, का, की
उपासना
# कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींनी सुवर्णदान किंवा सुवर्णवर्णाच्या वस्तूंचे दान करावे. तसेच दत्ताला नमस्कार करून महत्वाच्या कामास जावे.
# रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींनी दुग्धजन्य पदार्थ किंवा दूध दान करावे. महत्वाच्या कमला जाताना जांभळाच्या झाडाला दूध अर्पण करावे व नागस्तोत्राचा पाठ करून जावे यश मिळेल.
#मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी तांदळाची खीर पौर्णिमेला दान करावी किंवा चंद्राला नैवेध्य दाखवून ग्रहण करावी. तसेच दर पौर्णिमेला चंद्राला अर्घ्य द्यावे. चांदीच्या नागाचे पूजन करावे यश येईल.
* पुरुषांनी दत्ताची सेवा करावी
* महिलांनी कुंजीका स्तोत्राचा पाठ करावा, कुटुंबात शांतता लाभेल
* विध्यार्थीवर्गाने प्रज्ञापिवर्धन स्तोत्राचा पाठ करावा परीक्षेत यश मिळेल.
* वयस्कर व्यक्तींनी शंकराची उपासना करावी
# भाग्यरत्न राशीप्रमाणे हिरा
कुंडलीतील ग्रहस्थिती नुसार रत्न धारण करावे. त्यासाठी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
अंकशास्त्रानुसार ६ अंक शुक्राचा आहे.
# शुभवार : गुरुवार, शुक्रवार
# शुभमहिने : जानेवारी, फेब्रुवारी, जुलै
#रंग : गुलाबी, आकाशी, चॉकलेटी
( भाग्योदय वयाच्या चोवीस वर्षांपासून)
रोज सकाळी राशी भविष्य पाहायला मिळेल का