वार्षिक राशी भविष्य ” धनू”(saggittirius)

0
749
 belgaum

(राशीस्वामी- गुरू) धनू (annual-horoscope-saggittirius)

||परिस्थितीवर मात कराल|

राशी वैशिष्ट्ये

 belgaum

धनू ही कालपुरुष कुंडलीतील नववी राशी आहे. या राशीचे स्वामित्व पूर्वेला असते. अग्नितत्वाची रास आहे. या राशीचे लोक हे प्रेमळ स्वभावाचे, मर्यादाशील, मणी आणि दुसऱ्याला मदत करणारे असतात. अधिकारप्रिय आणि क्षमतेपेक्षा जास्त कार्यशाली असतात.स्वभाव वैशिष्ट्ये

या व्यक्ती दयाळू, धार्मिक, दुरदृष्टीच्या असतात. हे पटकन कुणावर विश्वास टाकत नाहीत. कष्टाने हे पुढे येतात. कठीण श्रमातूनच त्यांना यश मिळते. हे सहसा कुणाशी वैर करत नाहीत, जशी समोरची व्यक्ती तसे ते वागत असतात.

गुरूचा अंमल असल्याने धार्मिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, सोने चांदी व्यापार, कलावन्त, लेखक आशा क्षेत्रात हे लोक दिसून येतात.

यांना मज्जासंस्थेचे विकार, यकृत, पोटाचे विकार, घशाचे विकार विशेष दिसून येतात.

वार्षिक ग्रहमान

जानेवारी व फेब्रुवारी महिना अध्यात्मिक बाबतीत प्रगतीकारक राहील .या काळात आपल्या राशीच्या व्ययस्थानात गुरु असल्याने थोड्या काळाकरता आपल्या राशीत येईल. त्या काळात बरेच स्थैर्य देईल.  व्ययातला गुरु शुक्र धार्मिक स्थळांना भेटी देणे तीर्थयात्रा करवेल .घरात एखादे धार्मिक अनुष्ठान होण्याची शक्यता आहे .लग्नातील शनी प्रकृती संबंधी थोडी कुरबूर देईल. धनु राशीचा साडेसातीचा दुसरा भाग चालू आहे. साडेसाती लग्नाला असता शारीरिक व्यथा होते .चन्द्राला असता शनि मानसिक त्रास देईल . व रवीला साडेसाती असता उद्योग धंदा नोकरीत त्रास देईल. हे तिन्ही एकत्र कुठल्याही स्थानात असता तिन्ही पातळीवर त्रास होतो .एखाद्या किंव्हा तुमच्या राशीला साडेसाती असली तरी एखाद्याला ऊर्जितावस्था येते तर एखाद्या व्यक्तीला रसातळाला नेते असा फरक का दिसतो तर जन्म कुंडलीच्या चंद्र शनीच्या शुभग्रहांशी अनिष्ट व चांगल्या संबंधांवर अवलंबून आहे .

फेब्रुवारी मार्च एप्रिल या काळात थोड्या काळाकरिता आपला राशीतील गुरू शनी केतू प्लूटो गुरु शनि गोचरीने आपल्या राशीत असल्याने परदेशगमनाचे योग देईल.नातेवाईकांशी विशेष जमणार नाही. शत्रूचा त्रास होईल. दीर्घ दुखणे उद्भवतील. तसेच शनि उदासीनता देतो. बुधामुळे नवीन मित्र मिळतील. तसेच तृतीयस्थानात बुधाबरोबर शुक्र मानसन्मान दर्जा वाढवितो. मित्रापासून लाभ होतील. चैनीच्या वस्तूंवर खर्च होईल. जवळचे प्रवास व्यापारी लोकांना लाभ होतील . जुने नातेवाईक भेटतील. नोकरी व्यवसायिकांना आर्थिक लाभ होतील. चौथ्या स्थानात रवी असल्याने त्याची वास्तूसंबंधी किंवा प्रॉपर्टी संबंधित जमीन याबद्दलची कामे पुढे सरकणार नाहीत त्यामुळे या काळात प्रॉपर्टी संबंधी देवघेवीचे व्यवहार करू नये. १४ एप्रिल ला रवी हर्षल पंचमात येतो शेअर मार्केट मध्ये काम करणाऱ्यांनी नुकसानी पासून सावध राहावे. आपल्या षष्ठस्थ मंगळ या काळात शत्रूपासून जय देईल.

मे-जून   मे सातला मंगळ राहु युती सप्तमात होते. या काळात वैवाहिक जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येतील तसेच भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांना प्रतिकूल काळ राहील या काळात स्त्रियांनी कुटुंबात शांतता टिकून राहील याची काळजी घ्यावी. विद्यार्थीवर्गाला या काळात नवीन काही शिकण्याची संधी मिळेल. बुध मंगळ लेखन गणित राजकारणी लोकांना चांगला राहील. राजकारणी लोकांना राजकीय बाबतीत चांगले परिणाम देणारा राहील. कला क्षेत्रातील लोकांना देणारा काळ राहील. कला साहित्य संगीत क्षेत्रातील लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील .महिलांना मुलांना मामाचे सौख्य लाभेल. त्याच्यासंबंधी चांगली बातमी कानी पडेल .

Dhanu

जुलै-ऑगस्ट।  जुलै महिन्यात होणारे ग्रहण अनिष्ट फळे देणारे राहील जुलै महिन्यात अष्टमस्थ रवि-मंगळ आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. या काळात वयस्कर मंडळींनी आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहावे .वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी .येथील शुक्र-मंगळ युती आणि अनीतीकारक गोष्टी घडवते. या काळात तरुण-तरुणींनी मोहाला बळी पडू नये. वारसाहक्काने या काळात एखाद्या आर्थिक लाभ होऊ शकतो .नोकरीत असणाऱ्यांना नवीन जबाबदार्‍या स्वीकाराव्या लागतील. आता केलेल्या कुठल्या गोष्टी किंवा कष्ट पुढील काळात फलप्रद होतील.

सप्टेंबर  ते ऑक्टोबर या काळात सप्टेंबरला दशमस्थ रवि मंगळ शुक्र योग सर्व चांगला राहील. प्रॉपर्टी संबंधी कामे मार्गी लागतील. सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर प्रयत्नात यश देईल.  दशमस्थ ग्रह सिंह राशीत रवी सोबत असल्याने स्वगृहीचा रवी चांगली फळे देईल. व्यापारात आर्थिक लाभ होईल. नोकरी असणाऱ्यांना प्रमोशन होईल. महिलांना व्यवसायात यशदायी काळ आहे. विशेष कापड व्यवसाय तसेच सुगंधी द्रव्य चांदी सोने व्यापारी लोकांना विशेष लाभदायी राहील.

नोव्हेंबर डिसेंबर   ९ नोव्हेंबरला गुरु धनु राशीत प्रवेश करेल या काळात तरुण-तरुणींच्या विवाह संबंधी बोलणी यशस्वी होतील. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून आर्थिक लाभ होतील. महिला वर्गाला मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर प्रवासाचे योग येतील. नोकरीत असणाऱ्याना परदेशगमनाचे योग येतील . जुनी येणी वसूल होतील. वयस्करांना पोटाच्या तक्रारी जाणवतील .या काळात खाण्यावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थी वर्गाने निर्णय घेताना वडिलांचा सल्ला घ्यावा.

काही महत्वाचे

# धनू राशीतील नक्षत्रे:  मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा

# मूळ स्वभाव : दयाळू, परोपकारी नाम अक्षर : ये, यो

# पूर्वाषाढा स्वभाव : शौकीन, अभिमानी नाम अक्षर : भ, भी, भू, ध, क, ढ

# उत्तराषाढा स्वभाव : धनी, शीत नाम अक्षर:  भ

उपासना

# मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी काळ्या कुत्र्याला चपाती घालावी. केतूचा जय करावा.

# पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी कुलदेवीला अभिषेक करावा, पिंपळाच्या खाली दहीभात ठेवावा. दुर्गास्तोत्र वाचावे.

# उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी गाईला गूळ, हरभरा डाळ हरभरा डाळ घालावे.. सुर्यमंत्राचा जप करावा.

# भाग्यरत्न  राशीप्रमाणे पुष्कराज

कुंडलीतील ग्रहस्थिती नुसार रत्न धारण करावे. त्यासाठी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.

# शुभवार : मंगळवार, गुरुवार

# शुभमहिने : मार्च, एप्रिल, ऑगस्ट, सप्टेंबर

#रंग : जांभळा, सोनेरी

# शुभ अंक अंक शास्त्रानुसार ३

( भाग्योदय वयाच्या २१ ते ३० या दरम्यान होईल)

Subhedar jyotishi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.