(राशीस्वामी- शुक्र)
|| संयम ठेवा||
राशी वैशिष्ट्ये
तूळ ही कालपुरुष कुंडलीतील सातव्या क्रमांकाची राशी आहे. या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीचे स्वामित्व पश्चिमेला असते. या राशीचे लोक दिसण्यात आकर्षक असतात. शास्त्र, कला, सौन्दर्य, याची आवड असणाऱ्या असतात. हुशार, बुद्धिमान, समतोल वृत्तीच्या असतात. शांत, न्यायप्रिय, महत्वाकांक्षी, सत्वगुणी तसेच तडजोड करण्याची वृत्ती असते.
स्वभाव वैशिष्ट्ये
आपल्या मोहक व गोड वागणुकीने ते सर्वांना आपलेसे करून घेतात. तसेच निश्चयी स्वभाव असतो. आपले मत ही माणसे कधीच बदलत नाहीत. निर्णयावर ठाम असतात, सगळ्या बाबतीत समतोल पणा राखणे, योग्य न्याय देणे उत्तम जमते. या राशीचे लोक उत्तम न्यायाधीश असू शकतात.
या राशीचे लोक विशेष करून सौन्दर्य कारक वस्तूंच्या व्यापारात दिसून येतात. सुगंधी वस्तूचे व्यापार, उदबत्त्या, कॉस्मेटिक्स, वस्त्र व्यवसाय, रंगकाम, रंगीत छपाई, प्रिंटिंगची कामे यात आढळतात. या राशीच्या स्त्रिया देखण्या, मोहक सौन्दर्याच्या आणि टापटीप असतात. विणकाम, भरतकाम, कला, वाद्य हा त्यांचा मुख्य छंद असतो. यात त्या प्रवीण असतात, रांगोळी रेखाटने, चित्र काढणे यात निपुण असतात. राजकारण, कला क्षेत्रातही या राशीच्या व्यक्ती उत्तम कामगिरी पार पाडतात.
पोटाच्या आतड्यांना सूज येणे, मूत्रपिंडाचे विकार, स्त्रियांना गर्भाशयाची दुखणी किंवा त्यासंबंधी आजार उद्भवतात.
वार्षिक ग्रहमान
यावर्षीचे ग्रहमान आपणास फलप्रद राहील या वर्षात होणारी दोन्ही ग्रहणे आपणास शुभ फलदायी ठरणार आहेत .त्यासाठी थोडी संयम व श्रद्धा ठेवून चालल्यास आलेल्या संधीचा योग्य फायदा होईल. वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी व फेब्रुवारीत आपल्या द्वितीयातील गुरू-शुक्र सांपत्तिक स्थिती चांगली ठेवेल. गृहसौख्याच्या दृष्टीने विशेष चांगला राहील. वर्षभर गुरु इथेच राहील. मधला काही काळ वगळता गुरुचे फळ आपणास चांगले लाभेल. द्वितीय स्थानातील गुरू हा आपणास बरीच चांगली फळे देईल. शत्रूवर विजय मिळवाल आपणास नवीन दर्जा प्राप्त होईल हाती घेतलेली कामे जोमाने पूर्ण होतील एखादे कर्ज असेल तर ऋण मुक्त व्हाल. स्थावरात वाढ होईल नवीन आशेचा किरण दिसेल . वाटणीचे प्रश्न असतील तर ते मिटतील. ज्यांना संतान नाही अशांना संतान सौख्य लाभेल विद्यार्थी वर्गाला या काळात बक्षीस बक्षीस रुपाने काही मिळेल .स्त्रियांना घरातील लोकांची सौख्य लाभेल. तृतीयातल्या शनीमुळे व्यापारी लोकांना व नोकरीत असणार्यांनाही उद्योग-व्यवसायात लाभ होतील. व्यापारी लोकांना नोकर चाकरांचे सौख्य लाभेल. चांगले नोकर मिळतील .परंतु तृतीयात शनी प्रवासात अडचणी आणणारा असतो त्यामुळे या वर्षी प्रवास विशेष टाळावे .छोटे प्रवास तृतीय स्थानावरून पाहतो त्यामुळे छोटे प्रवास अडचणीत टाकतील. चतुर्थातला बुध शेतकरी वर्गाला चांगला राहील. एखादे जनावर खरेदी कराल .पशु खरेदीचे योग येतील. रवी आपणास मानहानी देऊ शकतो. एखादे व्यसन लागू शकते. व्यसनामुळे हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. विषय भोगामुळे मानहानी होऊ शकते
मार्च एप्रिल या काळात चतुर्थातील शुक्र केतू युती आपणास काही चांगले तर काही वाईट गोष्टी घडवतील .शुक्र चतुर्थास सुखकारक असला तरी त्याबरोबर केतू आहे. चतुर्थी केतू कुलदैवतांचे किंवा दैवी दोष देतो तसेच एखाद्या गोष्टीचे भय दाखवतो त्यामुळे या काळात आपण मानसिक दृष्ट्या दुर्बल पण येईल. या काळात मित्रांचे सहकार्य आपणास लाभदायी राहील. शुक्र वैवाहिक सुखाचा कारक ग्रह राहू-केतू बरोबर चांगली फळे देत नाही त्यामुळे या काळात सप्तमातील शुक्र-मंगळ युती व चतुर्थातील शुक्र केतू युती वैवाहिक सुखात अडचणी देईल. एखाद्याचे विवाह जमले असले तर फिसकटतील. पती-पत्नी मध्ये दुरावा निर्माण करणारा काळ असल्याने या काळात आपण समजून घेऊन चालावे. भागीदारी व्यवसायात असणाऱ्या व्यापाऱ्यांनी पैशाची गुंतवणूक करताना काळजी घ्यावी इलेक्ट्रिकल व्यवसायाशी संबंधित व्यापारी वर्ग अथवा नोकरदारांना हा काळ फायदेशीर आहे.
मे जून या काळात राजकीय क्षेत्रातील लोकांना बरेच चांगले अनुभव देणारा काळ राहील. मानसन्मान प्रतिष्ठा एकादे उच्चपद प्राप्त करू शकते. यासाठी तुमच्या कुंडलीतील ग्रहांची साथ तितकीच असेल तर सोन्याहून पिवळे समजा. राशीच्या तृतीयेत शनी केतू प्लूटो तर भाग्यात मंगळ राहु बुध दोन्ही उच्च स्थानात आहे. त्यामुळे शत्रू नाश तसेच मिथुनेचा भाग्यातील बुध चांगली फळे देतो. त्यासाठी थोडा संयमाने वागावे लागेल. तृतीयात शनी केतू बरीच अनुकूलता निर्माण करेल. कानाची दुखणी प्रवासात त्रास होऊ शकतो .भाग्यातला राहू मंगळही दूरच्या प्रवासात अडचणी देतो.
जुलै ऑगस्ट या काळात अष्टमस्थ रवी भाग्यात जातो. महत्त्वाच्या कार्यात सफलता देईल. त्याचबरोबर शुक्र धार्मिक कार्य घडवेल मोठ्यांकडून मान-सन्मान मिळेल. स्त्रियांना दागिने खरेदीचे योग येतील. हा शुक्र लांबचे प्रवास घडवतो. तीर्थयात्रा करण्याचे योजिले असेल तर या काळात आपली मनोकामना पूर्ण होईल. परंतु विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक दृष्ट्या चांगला असला तरी रवि शुक्र राहू युतीत असल्याने ज्ञानसंपादन कार्यात अडथळे आणवेल.
सप्टेंबर ऑक्टोबर या काळात हातून सत्कृत्ये घडतील. गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल .घर जमीन व्यवहार मार्गी लागतील. ऑगस्टमध्ये दशमात रवि बुध शुक्र येथील लाभात मंगळ येईल. २५ सप्टेंबरला आपल्या व्ययस्थानात रवी मंगळ शुक्र बुध या चार ग्रहांचे अधिपत्य राहिल. शुक्र मंगळ बाह्यख्यालीपण देऊ शकतो. पैशाचा अपव्यय होईल. डोक्यावर कर्ज होणे तसेच कु मार्गावर तरुणवर्ग जाऊ शकतो. या काळात मनाचा तोल सांभाळावा नको त्या मोहाला बळी पडू नका वैवाहिक जीवनात वादविवाद होतील एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण होतील नोकरीत असणाऱ्याना नोकरीत काही समस्यांना सामोरे जावे लागेल या काळात वरिष्ठांशी वागताना जपून वागावे . नोव्हेंबर डिसेंबर या काळात आपल्या राशीत मंगळ राहील तृतीयात ९ नोव्हेंबरला गुरु जाईल. तेथे गुरु शनी केतू प्लूटो युती आप्तांच्या तसेच मातेच्या स्वास्थाबाबत चिंताजनक राहील. तुळेतला मंगळ पोटाचा त्रास देईल. या काळात आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. लग्नेश व्ययात अष्टमेश लग्नी असा योग चांगला नाही. छोटे-मोठे अपघातापासून त्रास होतील. एकाद्या प्रकरणात अडकाल. या काळात कुठलिही गोष्ट विचार करून करावी. खाण्यापिण्याचा अतिरेक करू नये. तसेच लेखक कादंबरीकार कवी अशांना चांगला राहील. काही नवीन कल्पना कागदावर उतरवाल यातून आर्थिक लाभ होतील. एकंदरीत आपण संयमाने वागल्यास हे वर्ष आपणास फलप्रद राहील.
काही महत्वाचे
# तूळ राशीतील नक्षत्रे: चित्रा, स्वाती, विशाखा
#चित्रा स्वभाव : साहसी, बलवान नाम अक्षर : रा, री
# स्वाती स्वभाव : साहित्य प्रेमी, सात्विक नाम अक्षर : रु,रे,रो,ता
#विशाखा स्वभाव : चर्तुर , भोगवादी नाम अक्षर: ती,तू,ते
उपासना
# चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी फुटानेसाखर कुमारिकेला देणे. सरस्वती स्तोत्राचा पाठ करावा.
# स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींनी काळ्या चण्याची उसळ शनिवारी दान करावे. शनिस्तुती वाचावी.
# विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी खणा नारळाच्या ओटी भरून सवाष्ण जेवू घालावी. सप्त शनीचे पाठ वाचावे.
# भाग्यरत्न राशीप्रमाणे हिरा
कुंडलीतील ग्रहस्थिती नुसार रत्न धारण करावे. त्यासाठी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.विशेष करून अविवाहित व्यक्तीने हिरा घालू नये. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घातल्यास व्यभिचारी वृत्तीत वाढ करतो. वैवाहिक सुखाला तसेच संपत्तिकारक असल्याने विवाहितांनी विशेष वापरावा.
# शुभवार : गुरुवार, शुक्रवार
# शुभमहिने : जानेवारी, फेब्रुवारी, जुलै
#रंग : गुलाबी, आकाशी, चॉकलेटी
( भाग्योदय वयाच्या २४ ते ४२ या काळात होईल)