आजची रास ‘मकर’- राशी स्वामी शनी- ||प्रयत्नांना यश||
-मकर राशी काळ पुरुषाच्या कुंडलीतील दहावी रास आहे या राशीचा अमल दक्षिणेकडे असतोया राशीच्या व्यक्ती कामात तरबेज चिकाटी असणाऱ्या प्रत्येक काम विचारपूर्वक करणाऱ्या ,सात्विक, भावना प्रधान,अभिमानी विनम्र कृतज्ञ विद्वान असतात .दुसऱ्याना मदत करण्यास त्यांना आवडतेपरंतु शिस्तप्रिय असतात परंतु यां स्वतः स्थिर सावर व्हायला वेळ लागतो कष्टाळू वृत्ती त्यामुळे स्व कर्तृत्वावर काही तरी करायची धमक असते .या राशीच्या स्त्रिया कुटुंब चांगल्या प्रकारे सांभाळणाऱ्या व्यवहारी अध्यात्मिक,समोरच्या व्यक्तीची मन जिंकून घेण्याचुई कला त्यांना चांगलीच अवगत असते न्यायप्रिय असतात.
या राशीचे लोक मुख्यतः करून सरकारी नोकरी हॉटेल व्यवसाय तसेच राजकारण व कला क्षेत्रात उत्तम कार्य करू शकतात त्यामुळे या क्षेत्रात विशेष दिसून येतात या व्यक्तींना सर्दी खोकला मुळव्याधी सारखे आजार सांधे दुखी डोके दुखी सारकही आजार संभवतात धार्मिक संस्थात यांचा वावर असतो या राहसीचे लोक एका चांगला वकील किंवा न्यायधीश होऊ शकतात.
वार्षिक ग्रहमान
जानेवारी फेब्रुवारी महिना आपणास ग्रहमानाची साथ लाभेल आपल्या राशीच्या व्ययात शनी आला असल्याने मकर राशीचा साडेसातीचा सुरुवातीचा पहिला टप्पा सुरू झाला असून 24 जानेवारी 2020 ला आपल्या राशीत शनी येईल. आपल्या लाभात गुरू आले असल्याने वर्षाच्या सुरुवातीलाच आपणास काही लाभदायी गोष्टी घडवून आणतील. लाभेश व तृतीयेश याचा अनन्यो योग होत असल्याने मित्र-मैत्रिणी कडून लाभ होतील. त्यांच्या सहकार्यातून पुढे जाल. आपणास धनलाभ तसेच मानसन्मान नोकरीत असणार्यांना धनलाभ तसेच मानसन्मान नोकरीत असणाऱ्यांना बढती देणारा राहील. ज्यांचे विवाह झाले नाही अशा तरुण-तरुणींना हा काळ डोक्यावर अक्षता घालून जाणारा राहील. स्त्रियांना कौटुंबिक सौख्यात वाढ होईल.भाग्येश लग्नी स्वकष्टाने धन देतो. गोचरीनुसारआपला भागेश बुध लग्नात आपल्या राशीत येत आहे. आपणास केलेल्या कष्टाचा लाभ देईल. स्त्रियांना आपल्या आवडीच्या वस्तूंची खरेदीचे योग येतील.
मार्च एप्रिल 14 मार्च ला रवी तृतीयस्थानात मिनेत येत असल्याने या काळात आपल्या पराक्रमात वाढ होईल. उच्च स्थान असल्याने येथे रवीला बळ प्राप्त होते .परंतु चतुर्थस्थानात येणारा मंगळ हर्षल योग नातेसंबंधी चिंता निर्माण करेल.कोर्ट कचेरी प्रकरणात किंवा घर जमीन याविषयीची कामे लांबणीवर पडतील. खरेदी-विक्रीत घोटाळे त्यामुळे कोर्टात जाण्याची पाळी येते. मेषेचा मंगळ असल्याने स्वगृही चा काही चांगली फळे देईल. राजकीय कार्याच्या दृष्टीने हा चांगला राहील .मंगळ हर्षल योग अपघात घडवतो .तसेच 29 मार्च पासून 22 एप्रिल पर्यंत गुरु आपल्या व्ययात शनी बरोबर येत असल्याने गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यावी. गर्भावर गुरू शनी व्ययात असता त्रास होतो संततीचा कारक गुरू शनी बरोबर व्ययात प्लूटोयुक्त अचानक गर्भपात घडवू शकतो .त्या काळात विशेष काळजी घ्यावी.
मे-जून मेला षष्ठात मंगळ विषयासक्त पणा देईल. नातेवाईकांकडून त्रास पाळीव प्राणी अथवा जनावरांपासून त्रास होऊ शकतो. नोकरांकडून नुकसान होऊ शकते. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात अडथळे येतील. मज्जातंतूचे विकार तसेच मानसिक रोग किंवा बौद्धिक बाबतीत अस्थिरता देणारा राहील. राजकीय दृष्ट्या हा मंगळ-राहु बुध चांगली फळे देईल. पंचमेश शुक्र कला संगीत क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांना उत्तम राहील .एखादे बक्षीस किंवा उन्नतीकारक पद आपणास मिळेल. एखाद्या कलावंताला कलेतून नावलौकिक देईल. स्त्रियांना शुक्र सौख्यदायी राहील. जुलै-ऑगस्ट जुलै महिना असा आपल्याला संमिश्र फळ देणारे राहील. जुलैत होणारे ग्रहण आपणास अनिष्ट असल्याने या काळात मकर राशीच्या स्त्रियांनी विशेष करून गर्भवतीने ग्रहण पाहू नये ग्रहणाचे नियम पाळावे. अशा स्त्रियांनी स्वतःजवळ तुळशी व दुर्वा ठेवाव्या.ग्रहण संपेपर्यंत जवळ ठेवावे. २३ जुलैला सप्यमात शुक्र लाभतील गुरू विवाहाच्या दृष्टीने चांगली फळे देणारा राहील. तरुण-तरुणींचे विवाह जमतील. व्यापारी वर्गाला नवीन गुंतवणुकीतून फायदा होईल. चतुर्थेश सप्तमात शुक्र बरोबर असून कर्केत असल्याने थोडी वास्तू चिंता निर्माण करेल. ऑगस्ट महिन्यात अष्टमात येणारे रवी मंगळ बुध शुक्र सिंह राशीत असल्याने वडिलांच्या बाबतीत चिंता निर्माण होईल. एखाद्या व्यक्तीला विवाह लॉटरी यातून आर्थिक लाभ होतील .बक्षीस रुपाने धन मिळू शकते .व्यापारी लोकांना पूर्वी गुंतवणूक केलेल्या या काळात आर्थिक लाभ होतील.
सप्टेंबर ऑक्टोबर या काळात स्त्रिया धार्मिक सांस्कृतिक कार्यात भाग घेतील. पण तांत्रिक यांत्रिक व कला क्षेत्र यांच्याशी संबंधीत असणाऱ्यांना शुभ फळे मिळतील. समाजात मानसन्मान होईल. प्रवास योग येतील. पण प्रवासात अडचणी येतील .नातेवाईकांसाठीपैसा खर्च होईल. तरुण-तरुणींची प्रेम प्रकरणे मार्गी लागतील .नोकरीत असणार्यांनाही नोकरीत प्रगती होईल ज्यांना नोकरी नाही त्यांना रोजगार प्राप्तीचे योग येतील .
नोव्हेंबर डिसेंबर नोव्हेंबरला गुरु आपल्या व्यय स्थानात जात असल्याने या काळात व्ययातील गुरू शनि योग गुप्त शत्रूपासून त्रास देईल. व्यापार धंद्यात मोठे नुकसान होऊ शकते. एखाद्या व्यक्तीकडून फसवणूक होऊ शकते. खर्चाचे प्रमाण वाढेल. कामात उत्साह राहणार नाही .कर्जबाजारीपणा येऊ शकतो. या काळात कोणाकडून उधार-उसनवारी करू नये
मकर राशीचे नक्षत्र
उतराषाढा .श्रवण धनिष्ठा असून उत्तरा षाढा नक्षत्राचा स्वभाव – तेजस्वी ,अभिमानी,
श्रवण- नक्षत्र -स्वभाव -धार्मिक ,विनम्र
धनिष्ठा -नक्षत्र- स्वभाव -कठोर ,साहसी
उपासना
उत्तरषाढा नक्षत्र असणाऱ्यांनी शनिवारी मीठ उडीद शनीला वाहावे
श्रवण नक्षत्र असणाऱ्यां व्यक्तींनी मारुती किंवा शनीला रुद्राभिषेख करावा
धनिष्ठा नक्षत्र असणाऱ्या व्यक्तींनी रविवारी शमीची पूजा करावी उत्तराषाढा नक्षत्र असणाऱ्यांनी काळे चणे दान करावे
श्रवण नक्षत्र असणाऱ्यांनी सव्वा किलो गूळ दान करावा
धनिष्ठा नक्षत्र असणाऱ्या व्यक्तींनी पांढरे तांदूळ दान करावे
सध्या साडे साती काळ असल्याने सर्व मकर राशीच्या लोकांनी शनिवारी मारुतीला जावे पहिली अडीच वर्षे यशदायी राहतील
अंकशास्त्रा प्रमाणे ८ हा आकडा शनीचा आहे
शुभवार – बुधवार ,शनिवार
शुभमहिने -९,१०, १२
शुभ रंग -काळा तपकिरी पिवळसर
शुभ रत्न – नीलम राशी प्रमाणे
परंतु हे रत्न ज्योतिषाच्या सल्लया नुसारच घालावे वयाच्या ३० नंतरच भाग्योदय असणार आहे.