Friday, January 10, 2025

/

आजची राशी ” मेष ” वार्षिक राशी भविष्य(aries)

 belgaum

आजची राशी ” मेष ”

(राशीस्वामी- मंगळ)

|| कष्टाचे फळ मिळेल ||

 

राशी वैशिष्ट्ये

 

मेष ही कालपुरुष कुंडलीतील प्रथमस्थानी असणारी राशी आहे.या राशीचे चिन्ह मेंढा आहे. या राशीचा अंमल मुख्यत्वेकरून मस्तकावर असतो.ही चर राशी असून अग्नितत्वाची व पूर्व दिशेवर प्रभुत्व असणारी असते. ही राशी विषमराशी असून क्रूर राशी आहे. क्रूरता, सोशिकपणा, निष्टुरता, धाडस, साहसी, अहंकार, निर्भयता, कर्तृत्व, स्वावलंबित्व, कष्टाळू तसेच दुसऱ्यांवर हुकूम गाजवणे यांना आवडते.

 

स्वभाव वैशिष्ट्ये

 

मेष राशी चर स्वभावाची असल्याने चंचलपणा, अस्थिरता व घाईगडबडीत काम करणे, व्यवसाय नोकरीत वारंवार बदल करणे असे गुण या राशीच्या माणसात दिसून येतात.यामुळे बऱ्याचदा योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. स्वतःचे नुकसान करून घेतात. प्रवासाची विशेष आवड दिसून येते. अग्नीतत्व हा या राशीचा मुख्य गुणधर्म असल्याने यांची पित्तप्रकृती असते. यांना उन्हाळा सहन होत नाही तसेच उष्णतेचे विकार, डोळ्यांची जळजळ व डोक्यासंबंधी विकार होतात. याच अग्नितत्वाने राग चटकन येतो, स्वभावाने मोकळे आणि स्पष्ट बोलणारे लोक या राशीत आढळतात. घरातील व्यक्तींशी यांचे विशेष जमत नाही परंतु समाजात यांना मोठा मान असतो. परिश्रम करण्याची वृत्ती असल्याने स्वकष्टाने व पराक्रमाने पुढे येतात. दृढ संकल्पशक्तीमुळे आपले काम अडचणींवर मात करून पूर्ण करतात. धार्मिक तसेच शोधकवृत्ती दिसून येते. ज्योतिषशास्त्राची आवड असते.साहसी कामे म्हणजे सैन्यदल, पोलिसखाते तसेच अग्निसंबंधीत व्यवसायाशी व विद्युतसंबंधी खात्यासंदर्भात नोकरी किंवा व्यवसायात हे लोक आढळून येतात. किंवा या व्यावसायांशी त्यांचा जास्त संबंध येतो.

Anvekar gold mesh

वार्षिक ग्रहमान

 

जानेवारी महिना आपणास काही आर्थिक लाभ देऊन जाईल. राशीच्या अष्टमस्थानी होणारा गुरू शुक्रयोग त्या संदर्भात साहाय्य करेल. परंतु तुमच्या राशीत असणारा हर्षल स्वभावात अस्थिरता निर्माण करेल. पूर्वार्धा पेक्षाही उत्तरार्ध चांगला राहील काही नवीन उपक्रम हाती घ्याल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना नोकरी संदर्भात शुभवार्ता मिळेल. आर्थिक बाबतीत आपणास काळ चांगला असलातरी आरोग्याच्या दृष्टीने या काळात म्हणजे जानेवारी अखेर फेब्रुवारी चा सुरुवातीचा सप्ताह थोडा त्रासाचा राहील. विशेष करून ५ फेब्रुवारी ते २२ मार्च या काळात मेष जातकाने आपली विशेष काळजी घ्यावी. आधीच राशीत हर्षल असून त्या बरोबर ५ तारखेला मंगळ आपल्या राशीत येत असल्याने तापट पणा वाढेल.आपल्या वागण्यामुळे घरातील वातावरण बिघडणार नाही. याची विशेष काळजी घ्यावी. महिलांनी कुटुंबाचा समतोल राखावा या काळात नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना काळ उत्तम राहील. या काळात सरकारी नोकरी किंवा सैन्य भरतीसाठी इच्छूक असणाऱ्यांना काळ उत्तम राहील. सरकारी नोकरी मिळेल.
एप्रिल मे महिना व्यापारी वर्गाला आर्थिक बाबतीत चिंतकारक राहील. कागदपत्रे कायदेशीर बाबी याकाळात व्यवस्थित हाताळणे गरजेचे आहे. याकाळात तरुणवर्ग चैनीसाठी पैसे खर्च करतील. महिलांना नवीन काही करण्याची संधी प्राप्त होईल. मे अखेर काही महत्वाच्या घडामोडी होतील.
जुलै महिन्यात होणारे ग्रहण आपणास मिश्रफल देणारे राहील.
आरोग्याच्या दृष्टीने व नाते संबंधाविषयी विशेष फलदायी राहणार नाही. नातेवाईकांमध्ये गैरसमज निर्माण होतील. ऑगस्ट ८ ला आपल्या राशीच्या पंचमात येणारा मंगळ संतती संबंधी चिंता निर्माण करेल. गर्भवती महिलांनी याकाळात विशेष काळजी घ्यावी. आपल्या चतुर्थ स्थानी येणार बुध रवी शुक्र योग जमीन, मिळकती यासंबंधी कामे मार्गी लावील. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातली कामे विलंबाने पूर्ण होतील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक दारांना याकाळात नुकसान होण्याचा संभव आहे.
ऑगस्ट अखेर तरुण तरुणींना विवाहा दृष्टीने चांगला राहील. प्रेम प्रकरणे मार्गी लागतील. अविवाहितांचे विवाह जमतील. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन संधी येतील. बढती योग येतील. व्यापारी वर्गाला आर्थिक बाजू मजबूत करता येईल. परंतु याकाळात ज्यांना छातीचे अथवा हृदयाचे विकार असतील त्यांना याकाळात तब्येतीची काळजी घेणे जरुरी आहे. घरातील वरिष्टाच्या तब्येतीची विशेष काळजी राहील.

सप्टेंबरची सुरुवात जरी व्यापारी वर्गाला थोडी मंदीची असलीतरी उत्तरार्धात त्याची भरपाई करून घ्याल परंतु मेष जातकाच्या बलस्थानात होणारा बुध मंगळ योग पोटाच्या तक्रारी निर्माण करेल. तसेच हितशत्रुच्या कारवाया वाढतील. याकाळात नोकरीत असणाऱ्या वरिष्टाकडून अपमानास्पद वागणूक मिळण्याची शक्यता आहे. महिलांनी याकाळात घाई गर्दीने निर्णय घेणे टाळावे. प्रवासात त्रास होतील.
सप्टेंबर अखेर व ऑक्टोबरची सुरुवात विवाहितांना चांगली राहील. पूर्वी पती पत्नी मध्ये बिघडलेले संबंध सुधारतील. तसेच भागीदारी व्यवसायात असणाऱ्यांना लाभदायी काळ राहील. अशांना गुंतवणूक केल्यास काळ चांगला राहील. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या पूर्वार्धात आपली महत्वाची कामे करून घ्यावी. उत्तरार्ध विशेष फलदायी नसेल. याकाळात काही विचित्र अनुभव येतील.
नोव्हेंबर महिन्यात सप्तमातला बुध मंगळ योग हर्षलशी प्रतियोग करत असल्याने हा काळ योग त्रासदायक राहील. वैवाहिक जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. डिसेंबर महिना धार्मिक कार्य करविणारा राहील. याकाळात तीर्थयात्रा तसेच घरात एकाधे धार्मिक कार्यक्रम होतील. आपल्या भाग्यात सहा ग्रहांचे आगमन या महिन्यात आहे. भाग्यातील हे सहा ग्रह काही चांगल्या गोष्टी घडवून आणतील.
२६ डिसेंबरला होणारे सूर्यग्रहण आपल्या भाग्य स्थानात होत असून अष्टमात मंगळ लग्नात हर्षल असल्याने हे ग्रहण मिश्र फलदायी राहील. त्यामुळे या ग्रहणाच्या काळात अपघात होणे किंव्हा अप्रिय घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी. त्यादृष्टीने तब्येतीचीही काळजी घ्यावी.

 

काही महत्वाचे

 

# मेष राशीतील नक्षत्रे: अश्विनी, भरणी आणि कृतिका

# अश्विनी स्वभाव : तीक्ष्ण, चतुर,  नाम अक्षर : चू, चे, चो,ला

# भरणी स्वभाव : निष्टुर, चंचल, नाम अक्षर : ली, ले, लू, लो

# कृतिका स्वभाव : क्रोधी, स्त्री आकर्षण, नाम अक्षर : अ

 

उपासना : गणपती,मारुती, कुलदेवतेची( विशेष करून मंगळवारी)

# अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी अन्नदान करावे, भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी वस्त्रदान करावे, कृतिका नक्षत्र असणाऱ्यांनी सुवर्णदान किंवा सुवर्णवर्णाच्या वस्तूंचे दान करावे.

 

* पुरुषांनी महत्वाच्या कामाला जाताना लालवस्त्र (रुमाल) आपल्या जवळ ठेवावे.

* महिलांनी महत्वाच्या कामाला जाताना लाल गुंजा जवळ ठेवाव्या कामात यश येईल, स्त्रियांनी नित्य मंगळवारी कुंजीका स्तोत्राचा पाठ करावा, कुटुंबात शांतता लाभेल.

* विध्यार्थीवर्गाने विशेष करून गणपती अथर्वशीर्ष नित्य पठण करावे. कमीतकमी मंगळवारी तरी करावेच. परीक्षेला जाताना गणपतीला लाल फुल, गुळखोबरे अर्पण करावे.यश येईल.

* वयस्कर व्यक्तींनी मंगळवारी मारुती उपासना केल्यास लाभ येईल, मंगळवारी मारुतीला मोतीचूरचे लाडू अर्पण करून हनुमान चालीसा वाचावी

 

# भाग्यरत्न राशीप्रमाणे पोवळे

कुंडलीतील ग्रहस्थिती नुसार रत्न धारण करावे. त्यासाठी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.

अंकशास्त्रानुसार ९ अंक मंगळाचा असल्याने भाग्यांक ९ असणाऱ्यांनी वरील उपासना करता येईल.

# शुभवार : मंगळवार, गुरुवार, शुक्रवार

# शुभमहिने : जानेवारी, मार्च, एप्रिल, जुलै, सप्टेंबर

#रंग : तांबडा, नारिंगी,गुलाबी

 

( भाग्योदय वयाच्या सत्तावीस वर्षांपासून)

 

Subhedar jyotishi

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.