काँग्रेस रोडकडून शहराकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कँटरने पाठीमागून समोरून जाणाऱ्या कॅटरला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघाता नंतर कॅन्टरला लागलेल्या आगीत कॅटर चालक होरपळून मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटेच्या अडीचच्या दरम्यान घडली आहे. गोगटे सर्कल जवळ हा अपघात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समोरील कॅण्टरला पाठीमागून धडक दिल्यानंतर मागील कॅन्टरने पेट घेतला.नागालँड पासिंगचा हा कॅन्टर असून चालकाची अद्याप ओळख पटलेली नाही. या आगीत कॅण्टरचा समोरील संपूर्ण भाग जळून खाक झाला. या घटनेनंतर पुढच्या वाहन चालकाने पळ काढला.
बुधवारी पहाटे गोव्याहून खानापूर रोड मार्गे एकापाठोपाठ दोन कॅन्टर निघाले होते. गोगटे सर्कल जवळ पुढील वाहनचालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे पाठीमागील कॅन्टर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने जोराची धडक झाली. यावेळी कॅन्टरमधील एसीमध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. चालकाला काही कळण्यापूर्वीच संपूर्ण केबिनभोवती आग पसरली. भांबावलेल्या चालकाला केबिनचा दरवाजा उघडता आला नाही, शिवाय त्याचा कॅन्टर चालकाचा पाय एक्सलेटर व ब्रेकच्या मध्ये अडकल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. त्यामुळे चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जर का त्या वाहन चालकाने आग लागण्या अगोदर कॅटर मधील जखमीला बाहेर काढले असते तर कदाचित आगीत होरपळून मरण पावलेल्या जीव वाचला असता.घटनेची माहिती मिळताच वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.ठाणा अधिकारी व्ही एस टक्केकर यांच्या नेतृत्वाखाली या चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. वाहतूक दक्षिण विभाग पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.
Nl 01 L 3644 ही कॅटर नागालँड ची असून माल वाहू कॅटर आहे मयताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
गोगटे सर्कल जवळ बसवलेल्या सी सी टी व्ही फुटेज मध्ये कॅटरची धडक कैद झाली काय याचा तपास सुरू आहे. बुधवारी पहाटे घडलेल्या धक्कादायक अपघातामुळे पुन्हा एकदा चौका बद्दल प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे.काँग्रेस रोड कडून येताना गोगटे सर्कल मधील उड्डाण पूल आणि ग्लोब कडून अति वेगात येणारी वाहने न दिसल्यानेच झालाय की काय याचा देखील तपास सुरू आहे.