आज रविवार दिनांक सहापासून तिसऱ्या रेल्वे गेट वरील ओव्हरब्रिजचे काम सुरू होणार आहे .यामुळे वाहतूक पुन्हा काँग्रेस रोड मार्गे वळवण्यात येणार असल्याचा धोका निर्माण झाला असून पहिल्या रेल्वे गेट वरील बॅरिकेड हटवण्याची मागणी जोर धरत आहे.
यासाठी आज पुन्हा एकदा परिसरातील नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. चोवीस कोटीचा खर्च करून तिसरा रेल्वे गेट येथे नवीन ओव्हरब्रिज होणार आहे .यासाठी अठरा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
दीड वर्षाच्या काळात पुन्हा रहदारीच्या समस्या होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिक त्रासले आहेत. कोणत्या परिस्थितीत पहिल्या रेल्वे गेट जवळील बॅरिकेड्स हटवण्यात यावी अशी मागणी केली आहे.