बेळगावात मुख्य कार्यालय असलेल्या आणि संपूर्ण देशात शिक्षणासाठी नावाजलेल्या व्हिटीयु च्या घोटाळ्यांची चर्चा विधानसभेत झाली.
प्रश्नोत्तराच्या तासावेळी आमदार अभय पाटील यांनी विद्यापीठाच्या गैरकारभार प्रकरणातील चौकशीचा अहवाल मागीतल्यानंतर ही चर्चा झाली आहे.
विद्यापीठात अतिशय कमी दर्जाचे बांधकाम झाले आहे असा अहवाल केशव नारायण कमिटीने दिला आहे असे आमदारांनी सांगितले. बागलकोट चे आमदार विरान्ना चरंतीमठ यांनी हा भ्रष्टाचार कोट्यवधींचा असून यात उच्च स्तरीय चौकशीची मागणी व्हावी असे मत मांडले आहे.