डेफोडाईल्स या नावाने इंग्रजीत आणि हिंदीत नरगिस म्हणून ओळखली जाणारी पिवळी आकर्षक दुर्मिळ फुले बेळगावमध्ये टेरेस गार्डन मध्ये फुलली आहेत. ही आकर्षक फुले चित्तवेधून घेत आहेत.
माजी नगरसेविका लालन प्रभू यांनी आपल्या घराच्या टेरेसवर सुंदर बाग फुलवली आहे, या बागेत त्यांनी लावलेल्या या झाडाला आता फुले आली आहेत.
अनेक दुर्मिळ पुष्प आणि वनौषधींचा समावेश या बागेत असून ही बाग बघण्यासाठी परदेशातून लोक येतात.