कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी प्रमुख ९ कार्यालये बेळगावला म्हणजेच उत्तर कर्नाटकात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. कॅबिनेट मिटिंग मध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी रात्री झालेल्या या निर्णयाची घोषणा लवकरच होणार आहे.
कृष्णा भाग्य जल निगम, कर्नाटक निरावरी निगम, पॉवर लूम कॉर्पोरेशन, साखर संचालनालय आणि विकास आयुक्तालय, कर्नाटक शहर पाणीपुरवठा आणि ड्रेनेज बोर्ड, भूगर्भ खाते, एक सदस्यीय कर्नाटक राज्य मानव हक्क आयोग, माहिती खाते आणि उपलोकायुक्त खाते अश्या खात्यांचा यात समावेश असेल.
सभाध्यक्षांशी बोलून हा निर्णय जाहीर केला जाणार आहे. अखेर काही प्रमाणात का असेना पांढरा हत्ती गजबजणार आहे सुवर्ण विधान सौध गजबजणार आहे.