१०० वर्षे एक संस्था टिकणे कठीण आहे पण बेळगावच्या कॉलेज रोडवरील सोशल क्लब आणि क्रीडा भवन ने हा टप्पा पार केला आहे. आज या क्लबचा शतकमहोत्सव साजरा होत आहे.
एकशे दोन वर्षांपूर्वी वंटमुरीचे राजा लखमगौडा देसाई यांनी ही जागा सोशल क्लब व क्रीडा उपक्रम सुरू करण्यासाठी दिली होती.
स्थानिकांना एक हक्काची जागा मिळवून देणे हा त्यांचा उद्देश होता.
सामाजिक कार्यक्रम, क्रीडा व इतर कार्यक्रम व्हावेत असा उद्देश ठेऊन त्यांनी हा क्लब उभारण्यास मदत केली होती.
या क्लब मध्ये बॅडमिंटन कोर्ट, व्यायामशाळा, कार्ड रम, कोंफेरेन्स हॉल या सोयी आहेत.