अधिवेशनाला आलेले अधिकारी आणि पत्रकारांनी आज दिवसभर सहलींवर भर दिला आहे. कोल्हापूर गोवा आणि कोकण भागात फेरफटका मारून अधिवेशनाचा ताण कमी करून घेण्यात आला उद्या रविवारची सुट्टी असल्याने उद्याही सहली होणार आहेत, बरेचजण दोन दिवसांच्याही सहलीला जात आहेत.
बंगळूर च्या लोकांनी कोल्हापूरला जाऊन अंबाबाई चे दर्शन घेण्यावर जास्त भर दिला आहे तर तरुण वर्गाने आंबोली सारख्या पर्यटन स्थळांना भेटी दिल्या आहेत.
बरेचजण दोन दिवसांच्या सहलींसाठी गोव्याला गेले असून बेळगाव ते गोवा मार्गावरील रिसॉर्ट गर्दीने भरून गेले आहेत. कन्नड माणसांना मराठी आणि कोकणी पाहुणचार घेण्याची सवय लागली आहे.
अधिवेशननिमित्त बेळगावला आले की पहिल्या आठवड्याची सुट्टी पर्यटन करण्यात घालवली जाते तर त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात अधिवेशन संपले की घर गाठले जाते. आता सोमवारी अधिवेशन सुरू होऊन ते पुढच्या शुक्रवार पर्यंत चालणार असून त्यानंतर सगळे बेंगळूरकडे जातील.