बेळगावातील कर्नाटक विधी मंडळाचं अधिवेशन संपल्यावर लगेच दुसरा दिवस राज्य आणि बेळगावातील राजकारणा साठी महत्वपूर्ण दिवस ठरला आहे.शनिवारचा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला एकूण आठ नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली.
बेळगाव जिल्ह्यातील राजकारणावर प्रभुत्व असलेल्या जारकीहोळी बंधु पैकी रमेश जारकीहोळी यांची मंत्रिमंडळातुन अर्ध चंद्र मिळाला तर त्यांचे लहान भाऊ यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी तिसऱ्यांदा मंत्री पदाची शपथ घेतली.राज्यपाल वाजुभाई वाला यांनी त्यांना राजभवनात शपथ देवविली.मुख्यमंत्री एच डी कुमार स्वामी आणि उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांच्या मंत्री मंडळाचा विस्तार झाला.
गेले कित्येक दिवस या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली होती अखेर शनिवारी त्याची पूर्तता झाली.आता लवकरच खाते वाटप होणार असून सतीश जारकीहोळी यांना समाजकल्याण किंवा शिक्षण खाते मिळणार असल्याची माहिती काँग्रेसच्या गोटातून मिळत आहे.शनिवारी सकाळीच सतीश यांना मंत्रिपद मिळणार ही माहिती असल्याने त्यांचे समर्थक बंगळुरूला दाखल झाले आहेत बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेऊन ते सोमवारी बेळगावला येणार आहेत.
लोकसभा निवडणूक केवळ चारच महिन्यात असल्याने काँग्रेस जनता दल संयुक्त सरकारने जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांना खुश केले आहे त्यातल्या त्यात बेळगाव लोकसभा मतदार संघातील बैलहोंगलचे आमदार महंतेश कौजलगी यांना संसदीय सचिव,लक्ष्मी हेब्बाळकर यांना मैसूर मिनरल्स निगम मंडळ अध्यक्ष पद तर मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून खानापूर आमदार अंजलीताई यांना संसदीय सचिव पद बहाल केले आहे.