भाजपच्या दोन खासदारांत श्रेयवादामुळे चर्चेत आलेले गोगटे सर्कल उड्डाण पूल लोकार्पण होऊन दोन दिवस झाले नाहीत मात्र ब्रिज वरील लाईट बंद झाल्याने वाहन चालकांची गैरसोय होत आहे.
या ब्रिज व्यतिरिक्त इतर रोड वरील हायमास्ट सुरू होते मात्र उड्डाण पुला वरील लाईट बंद झाल्याने ये जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला.
वाहतुकीसाठी हा उड्डाण पूल सुरू झाल्याने काँग्रेस रोड आणि कपिलेश्वर उड्डाण पुलावरील ट्राफिकचा ताण कमी झाला आहे मात्र ब्रिज वर लाईट बंद असल्याने अनेकांनी दुसऱ्या रोडचा अवलंब केला.ब्रिज लोकार्पण झाल्या नंतर सतत दोन दिवस रात्रीच्या वेळी देखील अनेक हौशी लोकांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती मात्र गुरुवारी ब्रिजची बत्ती गुल झाल्याने इकडे कोणीच फिरकले नाही.
मराठा मंदिर च्या बाजूला रस्त्याच्या कडेनी घातलेले रिलिंग म्हणावे तेवढे मजबूत नसल्याने रात्रीच्या वेळी लाईट नसेल तर धोकादायक बनले आहे त्यामुळं ब्रिज वर लाईट सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे.श्रेयासाठी भांडण करणारे खासदार महोदय याकडे लक्ष देतील का महत्वाचा प्रश्न आहे.