बेळगाव शहराच्या दक्षिण आणि उत्तर भागाला दुवा म्हणून जोडलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे मंगळवारी लोकार्पण झाले.
या कार्यक्रमात राजकीय नेत्यांनी श्रेयासाठी मानापमान नाट्य केलं श्रेयासाठी भाषणातून एकमेकांना टोले लगावले मात्र खरोखर या उड्डाण पुलासाठी मेहनत घेऊन नियोजित वेळेआधी काम पूर्ण केलेल्या शिल्पकारांचा सत्कार बेळगाव सिटीझन कौन्सिलने केला आहे.
सिटीझन कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वात रेल्वेचे जी एम अजयसिंग, इतर मुख्य अभियंते आदींचा सत्कार केला.मंगळवारी उड्डाण पुलाचे उदघाटन झाल्यावर रेल्वे स्थानकावर जाऊन सिटीझन कौन्सिलने यांचा सत्कार केला.
उड्डाण पुलाची मुदत अठरा महिन्यांची असताना रेल्वे अधिकारी व कृषी इन्फ्रास्ट्रक्चर ठेकेदार यांनी मुदतीच्या अगोदर ब्रिजचे काम केले सदर ब्रिज वाहतुकीस खुला झाल्याने शहरातील रहदारीची समस्या बऱ्यापैकी सुटणार आहे.