वारंवार निवेदने देऊनदेखील एपीएमसी ते कंग्राळी खुर्द हा रस्ता केला जात नाही यामुळे आता जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांच्या नेतृत्वखाली सामान्य जनता रास्तारोको करण्याच्या निर्णयावर आली आहे.
उद्या शनिवारी सकाळी १० वाजता एपीएमसी समोर रास्तारोको करण्यात येणार आहे. या आंदोलनातून सरकार आणि प्रशासनाचे लक्ष या दुर्लक्षित रस्त्याकडे वेधून घेतले जाणार आहे. ए पी एम सी ते अलतगा अलतगा क्रॉस हा रस्ता तीन आमदार दोन खासदार एक स्मार्ट सिटी वाली महा पालिका एक स्मार्ट व्हिलेज अंतर्गत येतो तरी देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या रस्त्यात लोकशाही आहे की हुकूमशाही अश्या देखील बातम्या प्रसार माध्यमातून प्रसिद्ध केल्या तरी देखील मुझोर अधिकारी आणि सुस्त लोकप्रतिनिधी ना जाग येत नाही त्यामुळेच पुन्हा एकदा रस्ता रोको चे हत्यार बाहेर काढण्यात आले आहे
सद्या या रस्त्यावरील खड्डे मुजवून घेण्याची कामे सुरू आहेत पण दुरुस्ती नको पूर्ण रस्ताच करा अशी मागणी असून त्यासाठी हे रास्तारोको आंदोलन होणार आहे.