निवडणूक जवळ आली आहे. एवढ्यात लिफ्ट सुरू करू नका, मी निवडणूक पूर्वी हे उदघाटन करतो. अशी धमकी देऊन बेळगाव रेल्वे स्थानकावरील ती लिफ्ट सुरू न करण्याचा आदेश एक खासदाराने दिला असल्याचा आरोप होत आहे. या धमकीमुळे रेल्वे सेवा लिफ्ट सुरू करत नसून त्यामुळे नागरिकांना अंगावर ओझी घेऊन प्लॅटफॉर्म ओलांडून जावे लागत आहे.
या लिफ्टची सुरुवात का होत नाही आणि हे काम कुणामुळे आडले आहे याचा लवकरात लवकर तपास लावून ही लिफ्ट नागरिकांच्या सोयीसाठी लवकर सुरू करावी, अशी मागणी सिटिझन कौन्सिल या बेळगावच्या संघटनेने केली आहे.
नुकतीच या लिफ्टची कामाची पाहणी केली आहे. ती पूर्णपणे सुरू आहे पण प्रवाशांसाठी खुली नाही याचे आश्चर्य वाटत असल्याचे कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी बेळगाव live शी बोलताना सांगितले आहे.आजकाल श्रेय घेण्याची फॅशन आहे. निवडणूक आली की पटापट उदघाटन करून सरकारी कामे आपल्या नावावर खपवण्याचा प्रयत्न होत आहे. या लिफ्टची सुद्धा अशीच परिस्थिती झालेली असावी असा संशय येत आहे.
ज्या खासदारांना याचे उदघाटन करायचे आहे त्यांनी लवकर करून नागरिकांना दिलेली सोय मिळवून द्यावी असे पत्र आता केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे.