काँग्रेस जे डी एस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारा नंतर अखेर मंत्री पदाची शपथ घेतलेल्या आठ मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आली आहेत.मंत्रिमंडळ विस्तार नंतर अनेक मंत्र्यांनी मन पसंद खाते मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग केली होती.
सध्या वाटप झालेले दोन दोन खाती असणारे मंत्री खाती सोडायला तयार नव्हते यामुळे काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि प्रभारी वेणूगोपाल यांना खूप मेहनत घ्यावी लागलीअखेर अनेक मंत्र्यांची मनधरणी करून त्यांच्या जवळील अतिरिक्त खाती काढून घेण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.खालील प्रमाणे खाती वाटप अंतिम करून हाय कमांड कडे पाठवण्यात आले आहेत.
एम बी पाटील-गृह खाते
सतीश जारकीहोळी-वन खाते
एन टी नागराज-गृह निर्माण खाते
रहीम खान-युवजन सेवा आणि क्रीडा
आर बी थिंममापूर-कौशल विकास खाते
बी टी परमेश्वर नाईक-मजूर आय टी बी टी
इ तुकाराम-वैदयकीय शिक्षण
सी एस शिवळळी-नगर प्रशासन बंदरे खाते