शहरातील अनेक हॉटेल बार मध्ये सगळी कडे न्यू इयर सेलिब्रेशन साठी पार्टी आयोजित केल्या जात असल्या तरी बेळगाव जवळच्या काकती मधील मॅरिऑट हॉटेल मध्ये न्यू इयर सेलिब्रेशन ड्राय होणार आहे. काकती ग्राम पंचायतीच्या एका वार्डात पोटनिवडणूक होत असून सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने काकती ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात मद्य विक्रीस बंदी घातली आहे.
महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर असलेल्या बेळगाव शहरात पोलीस खात्याने न्यू इयर सेलिब्रेशन वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर उपाय केले आहेत त्यातल्या त्यात गोव्याहून बेळगावात येणारी अवैध दारू वाहतूक रोखण्यासाठी विशेष उपाय योजना केल्या आहेत. पोलीस अबकारी खात्याच्या सुरल जवळील चेक पोस्टवर बंदोबस्त वाढवला आहे. महाराष्ट्र आणि गोव्या कडून येणाऱ्या रस्त्यावर के एस आर पी तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.
बेळगाव शहरातील कॅम्प भागात ओल्ड मॅन मोठ्या प्रमाणात जाळले जातात त्यामुळे कॅम्प भागात न्यू इयर स्वागत जल्लोषी करण्यात येते यासाठी शहर पोलिसांकडून कॅम्प भागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे ज्या ज्या हॉटेल मध्ये गर्दी असते त्या हॉटेल समोर पोलीस तैनात केले जातील अशी माहिती डी सी पी सीमा लाटकर (कायदा आणि सुव्यवस्था)यांनी दिली.
गेल्या दोन वर्षात दारू विक्री बरोबर नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मागण्यात येणाऱ्या परवानग्या मध्ये कमी आली असल्याची माहिती अबकारी खात्याच्या सूत्रांनी दिली आहे तर या वर्षी मात्र शहर परिसरात अशी परवानगी कुणीच मागितली नाही.अबकारी खात्याचे जिल्हाधिकारी जे अरुण कुमार यांनी live ला दिलेल्या माहितीनुसार दारू विक्री आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी परवानगी देण्यास अबकारी खाते ११५०० रुपये घेऊन एक दिवसाचा परवाना देते गट करून लोक असे परवाने मिळवतात.